शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा, सर्वांनी केला एकमुखी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:45 IST

सुंजवान लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. सकाळी सभागृह सुरू होताच सर्व पक्षांचे आमदार सुंजवानच्या लष्करी तळावरील हल्ल्याच्या विरुद्ध एक झाले. त्यांनी हल्ल्याचा जोरदार निषेध केला आणि पाकविरोधी घोषणा दिल्या.

जम्मू : सुंजवान लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. सकाळी सभागृह सुरू होताच सर्व पक्षांचे आमदार सुंजवानच्या लष्करी तळावरील हल्ल्याच्या विरुद्ध एक झाले. त्यांनी हल्ल्याचा जोरदार निषेध केला आणि पाकविरोधी घोषणा दिल्या.आ. रवींद्र रैना यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सदस्य सभागृहात उभे राहिले. त्यांनी पाकविरोधी घोषणाबाजी केली. नॅशनल कॉन्फरन्सचे अली मोहंमद सगर, सीपीआयचे एम.वाय. तारिगामी आणि काँग्रेस सदस्य उस्मान माजीद यांनी हल्ल्याचा निषेध केला.आमदारांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांनी लष्करी तळावरील हल्ल्यात बांग्लादेशी तसेच रोहिंग्ये सहभागी असू शकतात, असे विधान केले. त्यामुळे सभागृहात झालेल्या प्रचंड गोंधळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.विरोधी पक्ष सदस्यांनी सर्व वादग्रस्त वक्तव्ये कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याची मागणी केली. ती अध्यक्षांनी मान्य करून हल्ल्यासंदर्भात काही सदस्यांनी केलेली वक्तव्ये कामकाज नोंदीतून काढून टाकण्याचे आदेश दिले.अखेर शनिवारी जम्मूमध्ये लष्करी तळावर अतिरेकी केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात कोणीही वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असे सभागृहात एकमुखाने ठरविण्यात आले. वादग्रस्त वक्तव्ये सार्वजनिक केली जाऊ नये, यावरही सभागृहाचे एकमत झाले.आमदारच म्हणाला पाक जिंदाबादभाजप सदस्यांनी पाकविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे चिडलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे मोहंमद अकबर लोण यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात लोण यांच्याविरुद्ध संतप्त वातावरण निर्माण झाले होते. नंतर लोण यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजप मुस्लिमांचा द्वेष करतो. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद अजीम मट्टू म्हणाले की, लोणे यांच्या वर्तनाशी पक्ष सहमत नाही. त्यांच्या घोषणा पक्षाला अमान्य आहेत आणि पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही तसे स्पष्ट केले आहे, असे सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर