शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात NRC लागू करण्याचा निर्णय अद्याप नाही, फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 15:27 IST

Illegal Rohingya migrants:सरकारने अवैधरित्या भारतात राहणाऱ्या रोहिंग्यांना देशासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्‍ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा ​​मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. संसदेत उत्तर देताना, गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं की, राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत NRC बाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांना परत पाठवण्याची तयारी सुरू आहे, असे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारने रोहिंग्यांकडून भारताला धोका असल्याचे म्हटलं आहे.

गृह मंत्रालयानं पुढे सांगितलं की, मागील अनेक दिवसांपासून देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा ​​मुद्दा जैसेथे आहे. देशात राष्ट्रीय स्तरावर अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत बोलताना रोहिंग्यांसह इतर सर्व बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकांना देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. 

आतापर्यंत दोघांनी काश्मीरमध्ये जमिनी खरेदी केलीमंगळवारी संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाल उत्तर देताना नित्यानंद राय यांनी सांगितलं की, कलम 370 रद्द झाल्यापासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरील राज्यातील दोघांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. आता राज्यात जमिनी खरेदी करण्याची प्रक्रीया सोपी करण्यात आल्यामुळे येणाऱ्या काळात अजून लोक या ठिकाणी जमिनी खरेदी करू शकतील.

टॅग्स :ParliamentसंसदRohingyaरोहिंग्याJammu Kashmirजम्मू-काश्मीर