शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पदवी परीक्षांचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 05:19 IST

परीक्षा होणार की नाही, या अनिश्चिततेने २७ लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्व विद्यापीठांनी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात, या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशांच्या विरोधात केलेल्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्यामुळे परीक्षा होणार की नाही, या अनिश्चिततेने २७ लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.यासंबंधीच्या मूळ यचिका ११ राज्यांमधील ३१ विद्यार्थी तसेच महाराष्ट्राचे मंत्री व भारतीय युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आणि परीक्षा घेण्याच्या विरोधात नंतर इतरही काही विद्यार्थी, शिक्षक संघटना तसेच ओडिशा, प. बंगाल व दिल्ली या राज्यांची सरकारेही त्यात सामील झाली. देशातील कोरोना महामारीचा जोर अद्याप कायम असल्याने परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या जिवास धोकादायक आहे. प्रत्येक राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात न घेता सर्वांना एकाच फूटपट्टीने मोजून परीक्षांची सक्ती करणे, केवळ अन्यायकारकच नाही तर राज्यांच्या अधिकारांचा संकोच करणारे आहे. त्यामुळे एक तर परीक्षा घेणे किंवा न घेण्याचा निर्णय राज्यांवर सोडावा अथवा अंतिम परीक्षा न घेता आधीच्या वर्षांच्या परीक्षांमधील कामगिरीच्या आधारे पदवी दिली जावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.याउलट विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणणे असे की, परीक्षेसह एकूणच शिक्षणाचा दर्जा ठरविण्याचा अधिकार व तो जपण्याचा अधिकार फक्त आयोगास आहे. राज्य सरकारे त्यात लुडबूड करू शकत नाहीत. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात पदवी हा त्याचे भवितव्य ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असल्याने परीक्षेविना पदवी दिली जाऊ शकत नाही.>रुग्णांत सहापट वाढविद्यापीठ अनुदान आयोगाने हे निर्देश ६ जुलै रोजी दिले त्या दिवसाच्या तुलनेत आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या सहापटीने आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे, अशा परिस्थितीत न्यायालय आयोगाचे म्हणणे मान्य करते की अमान्य, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.