शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 06:08 IST

कर्ज जीडीपीच्या ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चालू विनिमय दर, सार्वजनिक खाते आणि इतर दायित्वे लक्षात घेता बाह्य कर्जासह सरकारवरील एकूण कर्ज १८५ लाख कोटी रुपये किंवा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे. 

मार्च २०२४ अखेरीस एकूण कर्ज १७१.७८ लाख कोटी रुपये किंवा जीडीपीच्या ५८.२ टक्के होते, असे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, एप्रिल २०२४ नुसार, सध्याच्या किमतींनुसार भारताचा जीडीपी २०२३-२४ मध्ये आधीच ३.५७ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे, असे चौधरी म्हणाले.  २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये स्थिर किमतींवर खासगी अंतिम उपभोग खर्च वाढीचा दर अनुक्रमे ६.८ आणि ४ टक्के आहे, असे ते सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या तात्पुरत्या जीडीपी अंदाजांचा हवाला देत म्हणाले. 

राज्यांसाठी अनुदान मागण्यांतर्गत मदत 

अनुदान मागण्यांतर्गत केंद्र सरकार ‘विशेष साहाय्य’ या शीर्षकाखाली अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही आणि इतर गरजांसाठी राज्यांना हस्तांतरण अनुदान प्रदान करते, असे चौधरी म्हणाले.

राज्यांची कर्जाची कमाल मर्यादा जीडीपीच्या ४% 

चौधरी म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगाने शिफारस केल्यानुसार २०२१-२२ साठी राज्यांची सामान्य कर्ज घेण्याची कमाल मर्यादा जीडीपीच्या ४ टक्के निश्चित केली आहे. २०२१-२२ साठी अंदाजित जीएसडीपीच्या ४% सामान्य एनबीसीमधून २०२१-२२ मध्ये राज्यांनी केलेल्या वाढीव भांडवली खर्चासाठी अंदाजित जीएसडीपीच्या ०.५% कर्ज घेण्याची मर्यादा निश्चित केली होती. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारParliamentसंसदlok sabhaलोकसभा