शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी शेतक-यांसाठी निरुपयोगी, नीति आयोगाच्या सदस्यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 04:49 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा परिणामकारक उपाय नाही. कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्यावरही अपेक्षित परिणाम साधला जात नाही.

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा परिणामकारक उपाय नाही. कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्यावरही अपेक्षित परिणाम साधला जात नाही. कर्जमाफीतून शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देता येत नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या पैशात शेतकºयांच्या हिताच्या भावांतर अनुदानसारख्या इतर योजना राबविल्यास त्या फायदेशीर ठरतील, असे मत नीति आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी गुरुवारी व्यक्त केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.

शेतमालाचा बाजारभाव आणि हमीभाव यातला फरक भरून काढणाºया भावांतर अनुदान योजनेचे जनक म्हणून चंद यांची ओळख आहे. शेतकºयांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, हमीभाव आणि कर्जमाफीने शेतकºयांचे प्रश्न सुटत नाहीत. केंद्र सरकार २३ पिकांना हमीभाव जाहीर करते. मात्र, त्यापैकी फक्त तीनच पिकांना हमीभाव मिळतो हे वास्तव आहे. त्यासाठी या वर्षी आम्ही पिकांच्या उत्पादनावर नव्हे, तर शेतमालाच्या किमतीवर लक्ष केंद्रित करीत आहोत.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात ते म्हणाले की, देशातील सरासरी ६० टक्के शेतकरी कर्ज घेतात. त्यापैकी ३० टक्के बँकांकडून तर उर्वरित ३० टक्के इतर मार्गांद्वारे कर्ज घेतात. जे शेतकरी बँकांकडून कर्ज घेतात त्यापैकी सुमारे ७० ते ८० टक्के कर्जाची परतफेड करतात. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा लाभ तुलनेत कमी शेतकºयांना होतो, हे दिसून आले आहे. केंद्र सरकारने सन २००८मध्ये कर्जमाफी जाहीर केली होती. दर ४ ते ५ वर्षांनी देशात पुन्हा पुन्हा कर्जमाफीची मागणी केली जाते. आवश्यक परिणाम मिळत नसतानाही कर्जमाफीवर इतका मोठा आर्थिक स्रोत खर्चावा का, याबाबत विचार होण्याची गरज आहे. त्याऐवजी भावांतर अनुदान योजनेसारख्या इतर शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास शेतकºयांना अधिक लाभ होईल.व्यापक योजना जाहीर करणारराज्यांनी शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी किंवा भावांतर अनुदान योजना राबवली असेल, शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी केली असेल, मात्र खुल्या बाजारात विक्री करताना राज्य सरकारांना तोटा सहन करावा लागला असेल तर तोट्याच्या ४० टक्क्यांपर्यंत केंद्र सरकार राज्यांना मदत करेल. मध्य प्रदेशात अशा प्रयोगाला यश आले आहे, येत्या काळात संपूर्ण देशभर ही योजना राबवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. येत्या एक ते दीड महिन्यात यासंदर्भातील व्यापक योजना जाहीर केली जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरी