शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'जे झालं ते पुढे होणार नाही', उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीतील पराभवावर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 21:05 IST

या पराभवातून भाजपाला धडा मिळाला आहे.

नवी दिल्ली-  उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवावर केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवातून भाजपाला धडा मिळाला आहे. व ते सुधारण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल, असं राजनाथ सिंह यांनी म्हंटलं. 'जे झालं ते पुढे होणार नाही. असंही होऊ शकतं याची आम्हाला कल्पना आली, असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत भाजपाचा धुव्वा उडाला. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला.

राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. राहुल गांधी सरकारवर वारंवार टीका करतात. भारत कुणाच्या विरोधात उभा राहिला आहे, याचं उत्तर फक्त वेळच देईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. राहुल गांधी आमचे विरोधी नेते आहेत त्यामुळे ते बोलतच राहणार. त्यामुळे देश कुणाच्या विरोधात आहे हे वेळच सांगेल. 

दरम्यान, प्रतिष्ठेच्या असलेल्या गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नामुष्की ओढवली होती. हा पराभव योगी आदित्यनाथ यांच्या जिव्हारी लागला असून, या निवडणुकीत पक्षाला अतिआत्मविश्वान नडल्याचे म्हटले आहे. मात्र वेळीच ठेच लागली आहे. आता या पराभवातून लवकरात लवकर सावरू आणि २०१९ ची निवडणूक जिंकू, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. 

''आम्ही अतिआत्मविश्वासाने लढलो. त्यामुळेचा आमचा पराभव झाला. निवडणूक असो वा परीक्षा तयारीची एकदा चाचपणी जरूर केली गेली पाहिजे. मात्र या पराभवातून बोध घेऊन भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल."  असं आदित्यनाथ यांनी म्हंटलं होतं. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा