शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून खून करणाऱ्यास २२ दिवसांत फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 00:49 IST

घटना घडल्यापासून केवळ २२ दिवसांत तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले, तर न्यायालयाने पुढच्या २२ दिवसांतच खटल्याचे कामकाज पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : १५ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिचा खून करणाºयास कोलार (कर्नाटक) न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. घटना घडल्यापासून केवळ २२ दिवसांत तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले, तर न्यायालयाने पुढच्या २२ दिवसांतच खटल्याचे कामकाज पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.टी.एन. सुरेशबाबू ऊर्फ सुरी याची एका अल्पवयीन मुलीवर वाईट नजर होती. यावरून मुलीच्या वडिलांचा व त्याचा वाद झाला. यामुळे तो सुडाने पेटला. १ आॅगस्ट २०१८ रोजी १५ वर्षांची ही मुलगी शाळेतील खेळाचे सामने संपवून एका मैत्रीणीसोबत घरी येत होती.सुरेशबाबूने तिला रेल्वेरूळाजवळ पकडले. तिने ओरडताच तोंड दाबून धरले. तिची मैत्रीण घाबरून पळून गेली. त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने यास विरोध करताच दगडाने डोक्यावर व चेहºयावर मारले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिलारेल्वे रुळाजवळ टाकून तो पळाला. यामध्ये तिचा मृत्यू झाला.या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन ३ आॅगस्ट २०१८ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास २२ दिवसांत पूर्ण करून २३ आॅगस्ट रोजी भारतीय दंडविधान आणि पोक्सो कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले. कोलार (कर्नाटक)च्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. रेखा यांनी २५ आॅगस्ट रोजी खटल्याचे कामकाज सुरू करून ७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले आणि १५ सप्टेंबर रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्यात पोलीस आणि न्यायालय दोघांनीही दाखविलेली तत्परता उल्लेखनीय आहे. पोलिसांनी २२ दिवसांच्या तपासात अनेक पंचनामे, ३० पेक्षा जास्त साक्षीदारांकडे विचारपूस, फोरेन्सिक अहवाल, डीएनए तपासणी, ओळख परेड ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली. न्यायालयाने २२ दिवसांत चार्ज फे्रम केला. १५ साक्षीदार व ८४ कागदपत्रे तपासली आणि दोन्ही बाजंूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून खटला पूर्ण केला.संभाव्य गंभीर धोक्याचा विचार करणे गरजेचेशाळेत एकट्याने जाणाºया मुलींना असलेला धोका याचा गंभीर विचार होणे गरजेचे आहे. याबरोबरच मुलीच्या पालकांच्या वेदनांचाही विचार केला पाहिजे, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. अशा गुन्ह्यात कठोर शिक्षा दिल्यास संभाव्य घटना टळू शकतात, हे स्पष्ट करून न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या तत्पर आणि उत्कृष्ट तपासाचे न्यायालयाने निकालपत्रात कौतुक करताना अभियोग पक्षाने या प्रकरणात एकही उणीव ठेवली नाही, असे नमूद केले.गुन्हा घडला १ आॅगस्टगुन्हा दाखल १ आॅगस्टआरोपी अटक ३ आॅगस्टदोषारोपपत्र दाखल २३ आॅगस्टखटला सुरू २५ आॅगस्टखटला पूर्ण ७ सप्टेंबरशिक्षा १५ सप्टेंबर

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखून