शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

ऑक्सिजनअभावी दिल्लीत मृत्यूचे तांडव, डॉक्टरसह १२ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 06:56 IST

डॉक्टरसह १२ जणांनी गमावला जीव : एक तास २० मिनिटे ऑक्सिजनविना

नवी दिल्ली : प्रशासनाला वारंवार कळवूनही ऑक्सिजन पुरवठा उशिरा झाल्याने मेहरौली येथील बत्रा हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या १२ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मृतांमध्ये हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरिटिस विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. हिमथानी (६२) यांचाही समावेश आहे.

या रुग्णालयात ७२७ रुग्ण असून, त्यापैकी ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची पातळी कमी झाल्याचे हाॅस्पिटलच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याची दखल घेतली. त्यानंतर दीड तासाने ऑक्सिजन टँकर दाखल झाला. मात्र, तोपर्यंत या रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर दुसरा टँकर ४ वाजता रुग्णालयात पोहोचला. सुमारे एक तास २० मिनिटे रुग्णालयातील ऑक्सिजनपुरवठा खंडित झाला होता. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनची कमतरता दाखवत झालेल्या दुर्घटनांची नोंद केली. सध्या २२० रुग्ण ऑक्सिजनवर असून, पुढील २४ तास कठीण आहेत. पुरेसा ऑक्सिजनपुरवठा न झाल्यास अधिक जीवितहानी होण्याची भीती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. सुधांशू बनकाटा यांनी व्यक्त केली.

प्राणवायूअभावी जळगावमध्ये दोघांचा मृत्यूपाचोरा : प्राणवायूअभावी एका युवकासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. महेश तानाजी राठोड (३२) आणि जारसीबाई चव्हाण (७५) अशी मृतांची नावे आहेत.

पुन्हा वाढला लॉकडाऊन!

कोरोना संसर्गाची सध्याची स्थिती लक्षात घेता दिल्लीतील लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढविण्यात आला आहे. केजरीवाल यांनी शनिवारी लॉकडाऊन आणखी एका आठवड्याने वाढविण्याची घोषणा केली. नवीन आदेशानंतर १० मे रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाऊन लागू राहील. 

तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील लॉकडाऊनचा पहिला आठवडा संपल्यानंतर संक्रमणाचे प्रमाण सुमारे ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. गेल्या एक-दोन दिवसांपासून संक्रमण दर थोडा कमी झाला असून, आज तो ३० टक्क्यांपर्यंत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल