शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये मारहाणीत दलित युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:41 IST

कंबरेला बांधून मारले; पाच अटकेत

राजकोट : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील शापर शहरात रविवारी चोरीच्या संशयावरून कचरा वेचणाऱ्या एका दलित युवकाचा काही जणांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.ठार झालेल्या युवकाचे नाव मुकेश वानिया (वय ३५) आहे. त्याला दोघे मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. मुकेशच्या कंबरेला दोरीने बांधून एका माणसाने जखडून धरले आहे व दुसरा माणूस त्याला काठीने मारहाण करत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पोलीस अधीक्षक श्रुती मेहता यांनी सांगितले की, शापरमधील गुजरात औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात कंपनीच्या कंपाऊंडमध्ये कचरा वेचण्यास गेलेल्या मुकेश व त्याची पत्नी जयाबेनवर ते चोरीसाठी आल्याचा संशय मालकाला आला. त्यावेळी काही लोकांनी मुकेशला जबरदस्त मारहाण केली. त्याचे राजकोटमधील रुग्णालयात निधन झाले. (वृत्तसंस्था)दलितांवर सर्वात जास्त अत्याचार मध्य प्रदेशमध्ये होतात. गुजरातचा देशातपाचवा क्रमांक लागतो. २०१६च्या आकडेवारीनुसार देशातील एकुण गुन्हेगारीच्या टक्केवारीपैैकी २०% प्रकरणे दलितांवरील अत्याचारांचीहोती मात्र गुजरातमध्ये हेच प्रमाण ३२.५% होते. दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झाल्याचे प्रमाण गुजरातमध्ये फक्त ४.७%च आहे.मुकेश वानियाची पत्नी जयाबेन हिने शापर-वेरावळ पोलीस ठाण्यात रविवारी संध्याकाळी तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. त्यापैैकी चार जणांची नावे चिराग पटेल, दिव्येश पटेल, जयसुख राडाडिया व तेजस झाला अशी आहेत.जयसुख हा राडाडिया इंडस्ट्रीजचा मालक आहे व बाकीचे त्याचे मित्र आहेत. मुकेशला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवानी यांनीही टिष्ट्वटरवर जारी केला असून या राज्यामध्ये दलित सुरक्षित नाही अशी टीका केली आहे.

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणGujaratगुजरात