शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत व्यक्तीला पाठविला मृत्यूच्या दाखल्याचा संदेश, दिल्ली महापालिकेचा अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:34 IST

Death certificate message sent to a living person : आया नगर येथील निवासी असलेले ५६ वर्षीय विनोद शर्मा निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्येही कोणाचा मृत्यू झालेला नाही.

नवी दिल्ली : ‘मृत्यूचा दाखला देण्यासंदर्भातील तुमचा अर्ज मंजूर झाला असून, खालील लिंकवर क्लिक करून दाखला डाऊनलोड करून घ्यावा’, असा संदेश दिल्लीतील आया नगर येथे राहणाऱ्या विनोद शर्मा यांच्या मोबाईलवर आला आणि त्यांच्या संतापाला पारावार उरला नाही. दक्षिण दिल्ली महापालिकेचा अजब कारभार या प्रकारामुळे उघडकीस आला आहे. आया नगर येथील निवासी असलेले ५६ वर्षीय विनोद शर्मा निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्येही कोणाचा मृत्यू झालेला नाही. असे असताना त्यांच्या मोबाईलवर सकाळच्या प्रहरी वरीलप्रमाणे संदेश आला. या संदेशामुळे घरातल्या सगळ्यांचीच झोप उडाली. या प्रकारामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला, असे शर्मा सांगतात. त्यांनी याप्रकरणी स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार नोंदवली. त्यांनी तातडीने हा प्रकार महापौर आणि पालिका प्रशासनाच्या निदर्शानास आणून दिला. पालिका प्रशासनाने झाल्या प्रकाराबद्दल शर्मा यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. तसेच मोबाईल क्रमांक बदलून ज्यांनी मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता, त्यांच्याकडे तो पाठविण्यात आला. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी प्रशासनातर्फे घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :delhiदिल्ली