रेल्वेखाली सापडूून इसमाचा मृत्यू
By admin | Updated: January 23, 2015 01:04 IST
रेल्वेखाली सापडूून इसमाचा मृत्यू
रेल्वेखाली सापडूून इसमाचा मृत्यू
सोलापूर : जप्त केलेली जेसीबी मशीन तूर्तातूर्त न विकण्याचा मनाई आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एच. डी. एफ. सी. बँकेला दिला. तक्रारदार अर्जुनसिंग मनसावाले यांनी ॲड. जगदीश परदेशी यांच्यामार्फत ग्राहक मंचकडे धाव घेतली होती.मनसावाले यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बँकेकडून कर्ज घेऊन जेसीबी मशीन घेतली होती. बँकेने २५ हजार रुपये हप्ता ठरविला होता. ज्या दिवशी मशीन उचलून नेली त्या दिवशी मनसावाले यांनी ४२ हजार रुपये बँकेत भरले होते. रक्कम भरुनही बँकेने कसलीच पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यातून ४८ हजार ७१९ रुपयांचा धनादेश टाकून कर्ज वसूल केले. पुढे त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण सांगून धनादेश वटला नसल्याचे पत्र पाठविण्यात आले. कर्जदारास न सांगता आणि कुठल्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बँकेने त्यांच्या वसूलदाराकडून मशीन उचलून आणली. ॲड. जगदीश परदेशी यांनी मनसावाले यांच्या बाजूने युक्तिवाद मांडला. तो युक्तिवाद ग्रा धरून मंचचे अध्यक्ष मिलिंद पवार, सदस्य ओंकारसिंह पाटील, सदस्या बबिता महंत-गाजरे यांनी ती मशीन न विकण्याचा तूर्तातूत मनाईचा हुकूम केला. मनसावाले यांच्यातर्फे ॲड. जगदीश परदेशी, ॲड. सूरजसिंग लोधा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)