शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खात्मा होण्यापूर्वी अबू दुजाना म्हणाला, अभिनंदन तुम्ही मला पकडलं पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 10:15 IST

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी (1 ऑगस्ट ) सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा केला.  चकमकीदरम्यान अबू दुजानाला जवानांनी घेराव घातल्यानंतर त्यानं लष्कराच्या जवानांना आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता.  

श्रीनगर, दि. 3 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी (1 ऑगस्ट ) सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा केला. अबू दुजानाचा खात्मा भारतीय लष्करासाठी मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, चकमकीवेळी जवानांनी अबू दुजानाला घेराव घातल्यानंतर त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता.  

''टाइम्स ऑफ इंडिया''नं दिलेल्या वृत्तानुसार, लष्कराने एका काश्मीर नागरिकाच्या माध्यमातून मोबाइलद्वारे दुजानासोबत बातचित करण्याचा प्रयत्न केला. लष्कराचे जवान व दुजानामधील संभाषणाची ऑडिओ टेपमध्ये दुजाना अगदी शांततेनं संवाद साधताना ऐकायला मिळत आहे. जेव्हा काश्मिरी नागरिकाला त्यानं काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर त्या नागरिकानं फोन लष्कराच्या अधिका-यांकडे सोपवला.   यावेळी दुजानानं अधिका-यांना विचारले, ''कसे आहात? मी विचारत आहेत कसे आहेत? यावर लष्करी अधिकारी म्हणाले की, ''आमची काळजी सोडू दुजाना तू आत्मसमर्पण का करत नाही. तुझे ज्या मुलीसोबत लग्न झाले आहे आणि तू तिला जी वागणूक देत आहेस ती योग्य नाही'' 

भारतीय लष्कराचे अधिकारी व दुजानामधील हे संभाषण एका टेपमध्ये  रेकॉर्ड करण्यात आले आहे.  दरम्यान, यावेळी लष्कराच्या अधिका-यांनी दुजानाला असेही सांगितले की, पाकिस्तानी एजन्सी तुझा वापर करत आहेत आणि तू निष्पाप काश्मिरींसाठी एक समस्या बनला आहेस. पण यानंतरही दुजानानं आपला उद्धटपणा कायम ठेवला. 

दुजानानं यावेळी म्हटले की, आम्ही शहीद होण्यासाठी बाहेर पडलो, मी काय करू?. ज्यांना खेळ खेळायचा आहे त्यांनी खेळावं, कधी आम्ही पुढे तर कधी तुम्ही. आज तुम्ही मला पकडलं, अभिनंदन आहे तुमचं. ज्यांना जे करायचं आहे त्यांनी करावं. असे सांगत त्यानं पुढे लष्कराच्या अधिका-यांना सांगितले की, मी आत्मसमर्पण करू शकत नाही. माझ्या नशिबी जे लिहिलं आहे तेच होणार. अल्लाह तेच करणार, ठीक आहे. 

यावेळी भारतीय लष्कारातील अधिका-यांनी दुजानाला असेही सांगितले की, आपल्या आईवडिलांचा तरी विचार कर, मात्र याचाही त्यावर काहीही फरक पडला नाही. यावेळी अधिकारी त्याला असे आवाहन करत होते की, काश्मिरींना वाचव आणि त्यांचा दहशतवादासाठी वापर करू नकोस. मात्र यानंतर अचानक दुजानानं संवाद बंद केला. यानंतर दुजानाला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यासाठी आणखी एकदा शेवटचा प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याच्याकडून काहीही उत्तर आले नाही.