शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर वकिलाचा कोर्टात युक्तिवाद; न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 08:57 IST

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच हे घडले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : टीव्हीवर हातवारे करून मूकबधिरांसाठी बातम्या दिल्या जातात. याच भाषेत एका  मूकबधिर वकिलाने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच हे घडले आहे.

एका आभासी सुनावणीत  सांकेतिक भाषा दुभाषी सौरव रॉय चौधरी यांनी मूकबधिर अधिवक्ता सारा सनी यांचा सांकेतिक युक्तिवाद कोर्टात मांडला. सारा सनी यांना सुरुवातीला यासाठी परवानगी मिळत नव्हती; पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दुभाषी न्यायालयाच्या कार्यवाहीमध्ये सामील होऊ शकतो म्हणत त्यांना परवानगी दिली. सौरव चौधरींनी सांकेतिक भाषेचा अर्थ अनपेक्षित वेगाने सांगून उपस्थितांना अवाक् केले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दुभाषी ज्या वेगाने भाषेचा अर्थ सांगत आहेत ते आश्चर्यकारक आहे म्हणत त्यांचे कौतुक केले.

सांकेतिक भाषेचा वापर

अमेरिकन किंवा ब्रिटिश सांकेतिक भाषेत एकाच हाताचा वापर, तर भारतीय सांकेतिक भाषेत दोन्ही हातांचा व इशाऱ्यांचाही वापर केला जातो.

२०१५ मध्ये भारतीय सांकेतिक भाषा संशोधन  व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. २४ नोव्हेंबर २००१ रोजी पहिला ‘भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश’ प्रकाशित झाला.

या शब्दकोशात १२ राज्यांतील ४२ शहरांमधील २५०० हून अधिक चिन्हांचे दस्तऐवजीकरण केले आहे. याच शब्दकोशाचा वापर मूकबधिर वकील करतात.