शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

'यह प्रचार भारती...'! डीडी न्यूजचा लोगो करण्यात आला भगवा, राजकारण पेटलं, विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 15:26 IST

DD News Logo: यासंदर्भात बोलताना, राज्यसभेतील TMC खासदार जवाहर सरकार म्हणाले, “आता ही प्रसार भारती नही, तर प्रचार भारती आहे.''

दूरदर्शनअंतर्गत येणाऱ्या डीडी न्यूज या सरकारी चॅनलने आपल्या लोगोमध्ये केलेल्या बदलामुळे विरोधी पक्ष भडकले आहेत. डीडी न्यूजने नुकतेच अपल्या नव्या लोगोचे अनावरण केले. या लोगोचा रंग आधी लालसर होता. तो आता भगवा करण्यात आला आहे. यामुळे विरोध आक्रमक झाले आहेत. ब्रॉडकास्टरने या आकर्षक रंगांचा वापर हा चॅनेलच्या ब्रँडिंग आणि व्हिज्युअल सौंदर्याशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा बदल करण्यात आल्यानेही, विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.मंगळवारपासून करण्यात आला आहे बदल -डीडी न्यूजने मंगळवारी सायंकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवरून आपला नवा लोगो एका व्हिडिओ मेसेजसह पोस्ट केला होता. चॅनलने एक्सवर लिहिले होते, “आमचे मूल्य समान आहेत, आता आम्ही एका नव्या अवतारात ओलो आहोत. एका अशा वृत्त प्रवासासाठी तयार व्हा जी या पूर्वी कधीही बघितली नसेल. अगदी नव्या डीडी न्यूजचा अनुभव घ्या.” तसेच, “आमच्याकडे हे सांगण्याचे धैर्य आहे की, वेगापेक्षा अचूकता, दाव्यांपेक्षाही तथ्य आणि सनसनाटीपेक्षा सत्य. कारण हे डीडी न्यूजवर आहे, तर सत्य आहे! डीडी न्यूज – भरोसा सच का." असेही चॅनलने लिहिले आहे.  TMC खासदार म्हणाले 'प्रचार भारती' -यासंदर्भात बोलताना, राज्यसभेतील TMC खासदार जवाहर सरकार म्हणाले, “नॅशनल ब्रॉडकास्टरने आपला ऐतिहासिक फ्लॅगशिप लोगो भगवा केला आहे. मी याचा माजी सीईओ म्हणून या भगवीकरणाकडे चिंतित होऊन बघत आहे आणि अनुभवत आहे. आता ही प्रसार भारती नही, तर प्रचार भारती आहे.'' जवाहर सरकार 2012 ते 2014 दरम्यान प्रसार भारतीचे सीईओ होते.

प्रसार भारतीच्या सीईओचं स्पष्टिकरण -लोगोमधील बदलानंतर इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले, नवीन लोगोमध्ये आकर्षक केशरी रंग आहे. काही महिन्यांपूर्वी, G-20 (समिट)पूर्वी, आम्ही DD India मध्ये सुधारणा केल्या होती आणि चॅनेलसाठी ग्राफिक्सच्या सेटवर निर्णय घेतला होता. आम्ही दृश्य आणि तांत्रिकदृष्ट्या डीडी न्यूजच्या पुनरुज्जीवनावर देखील काम करत आहोत.

लॉन्चिंग वेळीही भगवाच रंग होता -ते पुढे म्हणाले, "चमकत्या, आकर्षक रंगांचा वापर हा चॅनेलच्या ब्रँडिंग आणि व्हिज्युअल सौंदर्याशी संबंधित आहे. याचा काही वेगळा अर्थ काढणे दुर्देवी आहे. हा केवळ एक नवा लोगो नाही, तर संपूर्ण स्वरूप अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच, 1959 मध्ये जेव्हा दूरदर्शन सुरू झाले, तेव्हा त्यावर भगवा लोगोच होता. यानंतर लोगोसाठी निळा, पिवळा आणि लाल असे रंगही वापरण्यात आले आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणtmcठाणे महापालिका