शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
5
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
6
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
7
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
8
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
9
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
10
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
11
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
12
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
13
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
14
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
15
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
16
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
17
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
18
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
19
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
20
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:58 IST

Dayanidhi Maran's Controversial Statement: द्रमुक खासदाराच्या वक्तव्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला.

Dayanidhi Maran's Controversial Statement: तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतातील महिला आणि तामिळनाडूमधीलमहिलांची तुलना करणारे वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, भाजपकडून याविरोधात तीव्र टीका करण्यात येत आहे. 

काय म्हणाले दयानिधी मारन?

एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना दयानिधी मारन म्हणाले की, 'तमिळनाडूमध्ये महिलांना शिक्षण आणि करिअरसाठी प्रोत्साहन दिले जाते. येथील मुलींनी आत्मविश्वासाने पुढे यावे, मुलाखती द्याव्यात, उच्च शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा असते. मात्र, उत्तर भारतात महिलांना कामावर जाऊ नका, घरातच रहा, स्वयंपाक करा आणि मुले जन्माला घाला, एवढेच काम तुमचे आहे, असे सांगितले जाते,' असे वक्तव्य मारन यांनी केले आहे.

‘द्रविड राज्य’ असल्याचा अभिमान

मारन पुढे म्हणाले की, 'आपले द्रविड राज्य तमिळनाडू हे एम करुणानिधी, सीएन अन्नादुरई आणि मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची भूमी आहे. इथे महिलांची प्रगती म्हणजेच राज्याची प्रगती आहे. त्यामुळेच जागतिक कंपन्या चेन्नईत येतात. इथले लोक तमिळसह इंग्रजीतही निपुण आहेत आणि नेतृत्व करतात,' असा दावा त्यांनी केला. याशिवाय,  तमिळनाडू हे देशातील सर्वोत्तम राज्य असून स्टालिन हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचेही म्हटले.

भाजपचा जोरदार पलटवार

मारन यांच्या वक्तव्यावर BJP कडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. तमिळनाडूतील भाजप प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी म्हणाले, 'दयानिधी मारन यांनी पुन्हा एकदा उत्तर भारतातील लोकांचा अपमान केला आहे. DMKकडून असे वक्तव्य वारंवार केले जाते,' असे ते म्हणाले. याशिवाय, भाजप नेत्या अनिला सिंह यांनीही टीका करत म्हटले की, 'हे विधान दुर्दैवी आहे. भारतात शक्तीची पूजा होते. उत्तर-दक्षिण असा भेद करून महिलांचा अपमान करणे आपल्या संस्कृतीविरुद्ध आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी वाड्रा किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत त्यांचे मत काय आहे?' असे त्या म्हणाल्या. 

DMK कडून वक्तव्याचे समर्थन

वाद वाढत असतानाच DMKने दयानिधी मारन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पक्षाचे नेते टी. के. एस. इलंगोवन म्हणाले, 'महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी कोणती पार्टी काय करते, हे त्या राज्यातील सरकारवर अवलंबून असते. तमिळनाडूमध्ये आम्ही महिलांसाठी लढलो, त्यांना शिक्षण दिले, रोजगार दिला आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणही दिले. उत्तर भारतात महिलांसाठी लढणारा कोणी नाही, ही वस्तुस्थिती आहे.'

English
हिंदी सारांश
Web Title : DMK MP's remark sparks row: North women cook, bear children.

Web Summary : DMK MP Dayanidhi Maran's comparison of Tamil Nadu and North Indian women sparked controversy. He claimed North Indian women are confined to household chores, while Tamil women are empowered. BJP strongly criticized the statement, but DMK defended it, citing women's empowerment efforts in Tamil Nadu.
टॅग्स :Dravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमTamilnaduतामिळनाडूBJPभाजपाWomenमहिला