शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचे पैसे

By बाळकृष्ण परब | Updated: December 19, 2020 13:16 IST

PM Kisan Sanman Nidhi Yojana : पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली - पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. शुक्रवारी मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. म्हणजेच ही रक्कम २५ डिसेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे.मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या रूपात जमा केली जाते. त्याचप्रमाणे  Rft Signed by State Government  असे लिहून आले असेल तर त्याचा अर्थ Request For Transfer म्हणजेच माहिती तपासण्यात आली आहे. तसेच ती पुढील प्रक्रियेसाठी ट्रान्सफर केली जाईल. याचा अर्थ काही काळाने तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल.FTO चा पूर्ण अर्थ Fund Transfer Order असा आहे. याचा अर्थ असा आहे की, राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक, बँक खात्यांची संख्या आणि बँकांचे आयएफएससी कोडसह अन्य विवरण प्रमाणित करण्यात आले आहे. तुमच्या हप्त्याची रक्कम तयार आहे आणि सरकारकडून तुमच्या बँक खात्यांमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार