शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी म्हणजे मालमत्ता नव्हे, तिचा विवाह स्वीकारा! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पालकांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:41 IST

सरन्यायाधीश संजीव खन्ना व न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले, विवाहावेळी मुलगी अल्पवयीन नव्हती. एफआयआर त्या व्यक्तीविरोधात करण्यात आला, कारण पालकांनी विवाह स्वीकारला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुलगी म्हणजे मालमत्ता नव्हे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेसाठी तिच्या जोडीदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी केलेली याचिका फेटाळली. विवाह झाला तेव्हा ती अल्पवयीन होती, असा दावा पालकांनी केला होता.

सरन्यायाधीश संजीव खन्ना व न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले, विवाहावेळी मुलगी अल्पवयीन नव्हती. एफआयआर त्या व्यक्तीविरोधात करण्यात आला, कारण पालकांनी विवाह स्वीकारला नव्हता.

काय आहे प्रकरण?nमहिदपूर येथील एका मुलीच्या वडिलांनी आपली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली असून, एका पुरुषाने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता.n१६ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने हा एफआयआर रद्द केला होता. मुलगी प्रौढ असून, तिने सहमतीने विवाह केला असल्याचे सांगत एफआयआर रद्द केला होता. उच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

तुम्हाला मुलीला बंधनात ठेवण्याचा अधिकार नाही. तुमच्या प्रौढ मुलीचे लग्न तुम्ही स्वीकारत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलीला मालमत्तेसारखे मानता. मुलगी ही काही मालमत्ता नव्हे. तिचा विवाह स्वीकारा, असे सरन्यायाधीश खन्ना म्हणाले.

ही स्त्रीद्वेषी मानसिकता कोची : महिलांना त्यांच्या कपड्यांवरून जज करणे किंवा घटस्फोटानंतर त्या दु:खी व्हाव्या अशी होण्याची अपेक्षा करणे ही 'स्त्रीद्वेषी मानसीकता' आहे, असे खडेबोल केरळ उच्च न्यायालयाने सुनावले. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एम. बी. स्नेहलथा यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना ही टिप्पणी केली. महिला तोकडे कपडे घालते, तिने घटस्फोटाची पार्टी केली, डेटिंग ॲपवर तिचे खाते आहे, अशी कारणे देत घटस्फोटित महिलेला मुलांची कस्टडी देण्यास कौटुंबिक न्यायालयाने नकार दिला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय