शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Daughter Claim Father's Property: मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळाला, पण शेत जमिनीत हक्क मिळणार का....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:11 IST

Daughter Claim Father's Property: सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिला आहे. ५१ पानांच्या या निकालाने महिलांना मोठा हक्क प्रदान केला आहे. असे असले तरी वडिलांची शेतजमिन मुलींना मिळणार का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिला आहे. 

पित्याच्या संपत्तीशी संबंधीत आणखी एक अधिकार महिलांना मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिला आहे. ज्यामध्ये वडिलांची संपत्ती जर मृत्यूपत्र केलेले नसेल तर मुलींनाही समान हक्क, प्राथमिकता मिळेल असा हा निकाल आहे. ५१ पानांच्या या निकालाने महिलांना मोठा हक्क प्रदान केला आहे. असे असले तरी वडिलांची शेतजमिन मुलींना मिळणार का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिला आहे. 

हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न बनविताच झाला असेल तसेच ती मालमत्ता त्याने स्वत: कमवलेली असेल किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे कायदेशीर वारसांमध्ये विभाजन होते. जर हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याची मुलगी ही वारस असेल, तसेच त्या पुरुषाचे भाऊ किंवा भावांची मुले आदींमध्ये जर वडिलोपार्जित संपत्ती वाटली जात असेल तर त्या पुरुषाच्या मुलीला समान हक्क मिळणार आहे.

यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलींना प्राधान्याने हिस्सा द्यायला हवा, त्यानंतर मुलांना. मुलींचा हक्क हिंदू उत्‍तराधिकार कायदा, 1956 लागू होण्याआधीपासून राहणार आहे. हा एक मोठा विजय असला तरी काही राज्ये अशी आहेत जी कृषी जमीन म्हणजे शेतीची जमीन मुलींमध्ये वाटली जाऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. शेतीच्या जमिनीचा कायदा हा राज्यांमध्ये वेगवेगळा आहे. तो राज्यांनुसार वापरला जातो. केंद्रीय कायदा आणि राज्यांच्या कायद्यात हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे. 

हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्‍मू आणि कश्‍मीर व पंजाब या राज्यांमध्ये मुलींना किंवा बहीणींना शेत जमिनीमध्ये हक्क मिळत नाही. विधवा आणि महिलांना काही अधिकार मिळाले आहेत, परंतू यामध्ये त्या पुरुषांपेक्षा मागे आहेत. दिल्लीमध्ये विधवांना शेतीच्या जमिनीवर अधिकार दिला आहे परंतू मुलींना नाही. उत्तर प्रदेशमध्ये मुलींना आणि बहीणींना शेत जमिनीमध्ये हक्क दिला आहे, परंतू प्राधान्यामध्ये त्या खाली आहेत. २०१५ मध्ये युपीत हा कायदा लागू झाला आहे. यातही मोठी अट आहे, म्हणजे मुलीला हक्क न मिळण्यासारखीच. मृताची विधवा पत्नी, पुरुष उत्तराधिकारी, आई-वडील किंवा अविवाहित मुलगी नसेल तरच त्या मृताच्या महिला वारसाला हक्क दिला जाईल. 

हरियाणामध्ये दोनदा महिलांना दिलेला हक्क हिसकावण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय अन्य राज्यांमध्ये महिलांना संपत्ती देण्यास विरोध होत आहे. यामुळे जोवर महिलांना शेत जमिनीमध्ये समान हक्क मिळत नाही, तोवर त्यांना मिळालेला संपत्तीवरील हक्काचा अधिकार अपूर्णच राहणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयWomenमहिला