शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अखेर सीबीएससीकडून तारीख जाहीर, 31 जानेवारीला होणार CTET परीक्षा 

By महेश गलांडे | Published: November 04, 2020 6:46 PM

परीक्षार्थींना इच्छित ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

ठळक मुद्देउमेदवारांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रांची शहरं देण्याचा अटोकाट प्रयत्न बोर्डाकडून करण्यात येत आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव परिस्थिती बदलल्यास, परीक्षार्थींनी निवडलेल्या 4 शहरांव्यतिरीक्त इतर कुठल्याही शहराची निवड केली जाऊ शकते.

नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे यंदाची परीक्षा पुढे ढकलण्यातआली असून यापूर्वी जुलै 2020 रोजी परीक्षा घेण्याचं नियोजन होतं. मात्र, आता 31 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येईल. केंद्रीय माध्यमिक बोर्डाने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. कोरोना महामारीचं सावट लक्षात घेऊन बोर्डाने परीक्षार्थींना परीक्षा केंद्राचं ठिकाण बदलण्याची मुभा दिली आहे. 

परीक्षार्थींना इच्छित ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. 7 नोव्हेंबरपासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा पर्याय उपलब्ध होणार आहे. परीक्षार्थींना 16 नोव्हेंबर पर्यंत हा पर्याय खुला राहणार असून या कालावधीत आपणास हव्या असलेल्या परीक्षा केंद्राची निवड करावी, असे आवाहनही बोर्डाने केले आहे. 

उमेदवारांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रांची शहरं देण्याचा अटोकाट प्रयत्न बोर्डाकडून करण्यात येत आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव परिस्थिती बदलल्यास, परीक्षार्थींनी निवडलेल्या 4 शहरांव्यतिरीक्त इतर कुठल्याही शहराची निवड केली जाऊ शकते, असेही सीबीएसईने म्हटले आहे. परीक्षा कालावधीत सामाजिक अंतर राखण्यासाठी तब्बल 135 शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार, लखीमपूर, नागाव, बेगुसराय, गोपाळगंज, पूर्णिया, रोहतास, सहरसा, सारण, भिलाई / दुर्ग, बिलासपूर, हजारीबाग, जमशेदपूर, लुधियाना, आंबेडकर नगर, बिजनौर, बुलंदशहर, देवरिया, गोंडा, मैनपुरी, प्रतापगड, शाहजहांपूर, सीतापूर आणि उधमसिंह नगर या नवीन शहरांचा परीक्षा केंद्रांसाठी समावेश करण्यात आला आहे.  

दरम्यान,  सीटीईटी परीक्षा जुलै आणि डिसेंबर महिन्यात वर्षातून दोनवेळा घेण्यात येते. सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांव्यतिरिक्त घेण्यात येणारी ही एकमेव भरती चाचणी आहे. 

टॅग्स :examपरीक्षाTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरतीCBSE Examसीबीएसई परीक्षा