केदारनाथाच्या दर्शनाने मोठी शक्ती मिळाली -राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2015 09:48 IST2015-04-25T01:31:14+5:302015-04-25T09:48:59+5:30

तब्बल १६ कि.मी. पायी चालत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भगवान केदारनाथाचे दर्शन घेत, त्यांची पूजाअर्चा केली

Darshan of Kedarnath received big power - Rahul Gandhi | केदारनाथाच्या दर्शनाने मोठी शक्ती मिळाली -राहुल गांधी

केदारनाथाच्या दर्शनाने मोठी शक्ती मिळाली -राहुल गांधी

केदारनाथ : तब्बल १६ कि.मी. पायी चालत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भगवान केदारनाथाचे दर्शन घेत, त्यांची पूजाअर्चा केली. मी केदारनाथबाबांकडे काहीही मागितले नाही; पण या पवित्र स्थळी येऊन एक वेगळी अनुभूती झाली, वेगळी शक्ती मिळाली, अशी भावना राहुल गांधी यांनी दर्शनानंतर व्यक्त केली.
राहुल गांधी गुरुवारी दिल्लीहून डेहराडूनला व त्यानंतर हेलिकॉप्टरने रुद्रप्रयागच्या गौरीकुंड येथे पोहोचले होते. गौरीकुंड येथून त्यांनी केदारनाथची पदयात्रा सुरू केली होती. येथून लिनचोलीपर्यंतचा १० कि.मी.चा रस्ता पाच तासांत पार करीत याठिकाणी त्यांनी रात्रीचा मुक्काम केला होता.
शुक्रवारी सकाळी सहा कि.मी.चा खडतर रस्ता पार करून सकाळी केदारनाथला पोहोचले. भाविकांच्या जत्थाच्या सर्वात पुढे राहुल चालत होते. त्यांच्यामागे एसपीजीच्या कमांडो होते.
सकाळी ८ वाजून ५९ मिनिटाला भगवान केदारनाथाच्या मंदिराची कवाडे विधिवत भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. यानंतर काही क्षणातच राहुल यांनी मंदिरात पूर्जाअर्चा केली. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Darshan of Kedarnath received big power - Rahul Gandhi