शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CAA : माझं सरकार बरखास्त करण्याचं धाडस करुनच दाखवा; ममता बॅनर्जींचं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:41 IST

Citizenship Amendment Act : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ममता बॅनर्जी आक्रमक; कोलकात्यात मोठा मोर्चा

कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. कोलकात्यात भव्य रॅली काढून बॅनर्जींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सरकारला लक्ष्य केलं. राज्यात नवा कायदा लागू करणार नाही. केंद्रानं माझं सरकार बरखास्त करण्याची हिंमत करुन दाखवावी, असं खुलं आव्हान ममता यांनी दिलं. ममता बॅनर्जींनी काढलेल्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. तुम्हाला माझं सरकार बरखास्त करायचं असेल, तर खुशाल बरखास्त करा. पण मी बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जींनी घेतला आहे. त्यांना वाटतं ममता बॅनर्जी एकट्या आहेत. मात्र आता माझ्यासोबत कित्येक जण आहेत. तुमचा हेतू चांगला असेल, तर जनता तुमच्या सोबत असते, असं त्या जनसभेला संबोधित करताना म्हणाल्या. ही धर्मासाठीची लढाई नाही, तर हक्कांसाठी चाललेला संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलं.  ममता बॅनर्जींच्या मोर्चाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. जोरासांको ठाकूरबाकी (रविंद्रनाथ टागोर यांचं बालवयात वास्तव्य असलेलं ठिकाण) इथं या आंदोलनाची सांगता झाली. ममता बॅनर्जींनी काढलेल्या या मोर्चाबद्दल राज्यपाल जगदीप धनखर यांनी नाराजी व्यक्त केली. ममतांचा मोर्चा घटनाबाह्य असल्याची टीका धनखर यांनी केली. 'मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चामुळे मी दु:खी आहे. त्यांचं हे पाऊल घटनाविरोधी आहे. यामुळे परिस्थिती चिघळू शकते,' असं ट्विट राज्यपालांनी केलं आहे. राज्यपाल धनखर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात याआधीही अनेकदा वाद झाला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMamata Banerjeeममता बॅनर्जीNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी