शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Anand Mahindra: दंगर्ल गर्लने खरेदी केली न्यू लाँच्ड 'स्कॉर्पिओ एन', महिंद्रा म्हणाले हा तर बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:38 IST

आनंद महिंद्रा यांनी अनेकदा सोशल मीडिया अकाऊंटवर जाहीर करुन अनेक खेळाडूंना महिंद्राच्या कार गिफ्ट दिल्या आहेत.

मुंबई - कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी आणि दंगल गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली कुस्तीपटू गीता फोगाटने महिंद्राची लेटेस्ट कार खरेदी केली आहे. महिंद्रा ग्रुपने नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आणि दसऱ्याच्या अगोदर महिंद्रा एसयूवी ची बिग डैडी' महिंद्रा स्कॉर्पियो-एन लाँच केली आहे. या गाडीची डिलिव्हरी देण्यासही सुरुवात झाली आहे. ऑलिंपिक पदक विजेती गीता फोगाटने ही कार खेरदी केली आहे. आनंद महिंद्रा यांना याबाबत माहिती होताच नेहमीप्रमाणे त्यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली. 

आनंद महिंद्रा यांनी अनेकदा सोशल मीडिया अकाऊंटवर जाहीर करुन अनेक खेळाडूंना महिंद्राच्या कार गिफ्ट दिल्या आहेत. तर, कोणी हटके मॉडेलची जुगाडू गाडी बनवल्याने, त्यांनाही नवी शोरुम कार दिल्याचं आपण सोशल मीडियावर पाहिलं आहे. आता, अथलेट गीता फोगाटने महिंद्र स्कॉर्पिओची कार खरेदी केली असून या नव्या गाडीचे घरी दिमाखात स्वागतही केले. त्यानंतर, आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. 

गीताने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गाडी खरेदी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच, अशी अविश्वसनीय कार बनविण्यासाठी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचे धन्यवाद केले आहेत. आजचा दिवस अतिशय सुंदर असून नवरात्रीच्या अगोदरच आमच्या घरी महिंद्रा स्कॉर्पिओ कार आली आहे. महिंद्रा ग्रुपचे या कार लाँचिंगसाठी धन्यवाद, असेही गीताने म्हटले.  गीताच्या ट्विटरवर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन रिप्लाय दिला आहे. हा आमच्यासाठी बोनस आहे, गीता फोगाटसारख्या प्रतिभाशाली व्यक्तीने स्कॉर्पिओ एन कारची निवड करणे आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे. तुमच्या गोल्ड मेडलचा लाभ आम्ही घेत आहोत, आम्हाला विश्वास आहे की आपल्या अपेक्षांची पूर्तता ही कार करेन, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राBabita Kumari Phogatबबिता फोगाटMahindraमहिंद्रा