शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

देशातील परिस्थिती भयानक झालीय; दलितांच्या सामूहिक धर्मांतरानंतर भाजपा खासदाराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:19 IST

गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरूण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग केला.

अहमदाबाद: उना येथील दलितांच्या सामूहिक धर्मांतराची घटना ही धोकादायक परिस्थितीचे द्योतक असल्याचा इशारा भाजपाचे गुजरातमधील खासदार उदित राज यांनी दिला. त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सामाजिक अन्यायामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. साधी मिशी ठेवली तरी दलितांना मारहाण केली जाते. हे सर्व रोखण्यासाठी नेमके काय करावे, हे मला माहिती नाही. परंतु, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, असे उदित राज यांनी म्हटले. गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग केला. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी रविवारी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या सोहळ्यात भिक्खुंकरवी 400 दलितांना बौद्ध धर्माची शपथ देण्यात आली. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यातंर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर या दलित कुटुंबीयांच्या धर्मांतराला अधिकृत मान्यता मिळेल. 

गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती. गोरक्षकांच्या टोळक्याने त्यांची धिंड काढली होती, तसेच त्यांना एका कारला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावरून केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काल या तरूणांनी अन्य काही दलित बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला.  

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचार