शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर सचिन आणि रेखाची खासदारकी रद्द करा - नरेश अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:18 IST

समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. 

ठळक मुद्देयाआधी सुद्धा गैरहजेरीचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित सचिनची 348 दिवसांत फक्त 23 वेळा उपस्थिती रेखाची हजेरी फक्त 18 दिवस

नवी दिल्ली, दि. 01 - राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी विषयी मुद्दा आज पुन्हा संसदेत मांडण्यात आला. समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल  यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना संसदेच्या सभागृहात यायचे नसेल, तर ते आपल्या खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. याचबरोबर ते म्हणाले, बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशात जाऊन बसलेल्या विजय माल्ल्याची जशी राज्यसभा खासदारकी रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखविण्यात यावा. दरम्यान, नरेश अग्रवाल यांच्या आधी सुद्धा सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या गैरहजेरीचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला होता. सचिन तेंडुलकरला 2012 मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून संसदेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरने एप्रिल 2017 पर्यंत म्हणजे 348 दिवसांत फक्त 23 वेळा राज्यसभेत हजरी लावली आहे. तर, अभिनेत्री  रेखा यांना सुद्धा 2012 मध्येच खासदार म्हणून पाठविण्यात आले होते. त्यांची एप्रिल 2017 पर्यंत उपस्थिती फक्त 18 दिवसांची आहे. तसेच, त्या दोघांच्या खासदारकीचा कार्यकाळ हा 26 एप्रिल 2018 पर्यंत आहे.