सुरत : गुजरात पोलीस विभागाची एका निरीक्षकाच्या लज्जास्पद वागणुकीमुळे चांगलीच नाचक्की झाली. सुरतच्या डिंडोली पोलीस ठाण्यात तैनात पोलीस निरीक्षक डी.सी. सोळंकी यांचा बार गर्लवर पैसे उधळताना आणि नाच करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सोळंकी पोलीस गणवेशात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका कार्यक्र मातील ही घटना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर रेकॉर्ड केली आणि नंतर व्हॉटस् अॅपवर हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी सोळंकी याला निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)
पोलीस निरीक्षकाचे बार गर्लसोबत नृत्य
By admin | Updated: December 27, 2014 00:23 IST