शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही : रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 17:33 IST

Ravishankar Prasad in Rajya sabha : भाजप खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी दिलं स्पष्टीकरण

ठळक मुद्देभाजप खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला होता प्रश्नइस्लाम, ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत मोठं वक्तव्य केलं. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ देण्यात येणार नाही. तसंच अनुसुचित जातींसाठी आरक्षित असलेल्या लोकसभेच्या अथवा राज्यसभेच्या जागांवरूनही त्यांना निवडणुका लढवता येणार नसल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत दिली. तसंच गुरूवारी प्रसाद यांनी राज्यसभेत ट्विटरसहित अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना इशाही दिला होता. भारतीय जनता पक्षाचे सदस्य जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना अन्य आरक्षित जागांवरून निवडणुका लढवण्यासाठी असलेल्या पात्रतेबाबत प्रश्न विचारला होता. "ज्या लोकांनी हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म स्वीकारला आहे ते अनुसुचित जातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवरुन निवडणुका लढवू शकतात. याव्यतिरिक्त या धर्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल," असंही प्रसाद म्हणाले. "संविधान (अनुसुचित जाती) आदेश, पॅरा ३ अनुसुचित जातींची राज्यवार सूचींची व्याख्या सांगते. या अंतर्गत कोणताही व्यक्ती हिंदू, शीख अथवा बौद्ध धर्मापेक्षा वेगळ्या धर्माचा स्वीकार करतो तो अनुसुचित जातीचा सदस्य मानला जाणार नाही. वैध अनुसुचित जातीच्या प्रमाणपत्रासोबत कोणतीही व्यक्ती आरक्षित असलेल्या जागांवरून निवडणुका लढवण्यासाठी पात्र आहे," असं उत्तर प्रसाद यांनी आरक्षित क्षेत्रावरून निवडणुका लढवण्याच्या प्रश्नावर दिलं. "सरकार लोकप्रतिनिधीत्व कायदा आणि निवडणुकीच्या नियमांमध्ये काही दुरूस्ती करण्याचा विचार करत आहे का, ज्यात स्पष्टपणे ख्रिस्ती आणि इस्लाम हा धर्म स्वीकारणाऱ्यांना दलित आरक्षित जागांवरुन निवडणूक लढण्यासाठी पात्र नसतील," असा सवालही जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी सरकारला विचारला. यावर उत्तर देताना सहकारनं नाही असं म्हणत असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचंही स्पष्ट केलं. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाHinduहिंदूElectionनिवडणूकMuslimमुस्लीमRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद