शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

त्रावणकोरच्या मंदिरात प्रथमच दलित, आदिवासी पुरोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 02:19 IST

केरळच्या प्रख्यात त्रावणकोर मंदिराने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्रावणकोर देवस्थान समितीने पुजा-यांच्या यादीत सहा अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांचा समावेश केला आहे

तिरुअनंतपुरम : केरळच्या प्रख्यात त्रावणकोर मंदिराने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्रावणकोर देवस्थान समितीने पुजा-यांच्या यादीत सहा अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांचा समावेश केला आहे. मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पुरोहितांच्या यादीत एकूण ३६ ब्राह्मणेतर असणार आहेत.त्रावणकोर मंदिर प्रशासनाने या आधीच ब्राम्हणांव्यतिरिक्त इतर जातींच्या व्यक्तींची पुजारी म्हणून नेमणूक केली होती, पण यंदा पहिल्यांदाच अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांची पुजारी म्हणून नेमणूक झाली आहे. मंदिराच्या निवड समितीने गुरुवारी ६२ पुजा-यांची नावे निश्चित केली. लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन, राज्य लोकसेवा आयोगामार्फत या नेमणुका करण्यात आल्या. या नव्या यादीत २६ ब्राह्मणांचा सहभाग आहे.ब्राम्हणेतर व्यक्तींच्या नेमणुकांना आमचा विरोध नाही, पण ज्यांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यांना धार्मिक विधी, तसेच पूजाअर्चा आदींची व्यवस्थित माहिती असावी, असे आमचे म्हणणे आहे. केवळ आरक्षणाच्या निकषांवर नियुक्त्या होता कामा नयेत. संबंधित व्यक्तीचे ज्ञान व मंदिराच्या कार्यप्रणालीवर व विश्वासावर निवड होणे अपेक्षित आहे, असे आॅल इंडिया ब्राह्मण फेडरेशनचे अक्कीरामन कालिदासन भट्टतीरीपाद यांनी म्हटले आहे.देवस्थान बोर्डाचे मंत्री कडकमपल्ली सुरेन्द्रन यांनी मेरिटच्या आधारे पुजाºयांच्या नेमणुका करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे, या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या. त्यासाठी सर्वांची एकत्र लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांच्याच मुलाखती झाल्या. त्यानंतर, प्रत्यक्ष नेमणुका केल्या, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)प्रथमच ब्राह्मणेतर पुजारीदेवस्थान बोर्डाचे चेअरमन राजगोपालन नायर म्हणाले की, अनुसूचित जाती, जमाती व ब्राह्मणेतर अन्य जातींच्या लोकांना मंदिरात पुरोहिताचे काम पहिल्यांदाच देण्यात येत आहे. त्रावणकोर देवस्थान समितीची स्थापना १९४९ साली झाली. अनेक वर्षांपासून मंदिरातील पुजाºयांच्या जागांसाठीही आरक्षण असावे, अशी मागणी होत होती.

टॅग्स :Templeमंदिर