शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा, केक आणा...' ICU मध्ये शेवटचा वाढदिवस साजरा केला अन् हसत-हसत जागाचा निरोप घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:14 IST

हाडांच्या कर्करोगाशी झुंझ अपयशी ठरली..!

आयुष्याशी झुंजत असतानाही चेहरा आनंदीत ठेवणे सोपी गोष्ट नाही. पण २७ वर्षीय प्रियांका उर्फ ​​पिहूने अतिशय कठीण परिस्थितीतही चेहऱ्यावरील हसू जाऊ दिले नाही. दुर्मिळ हाडांच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या प्रियांकाने २ सप्टेंबर रोजी शेवटचा श्वास घेतला. मात्र,  शेवटच्या क्षणांपर्यंत आपले आयुष्य आनंदाने आणि उत्साहाने जगले. तिने फक्त स्वतःचे आयुष्यच आनंदाने जगले नाही, तर इतरांना जगण्याची आशा देऊन गेली.

हाडांच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या प्रियांकाचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. पण, जाण्यापूर्वी तिने आयसीयूमध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आपला शेवटचा वाढदिवस साजरा केला. 'बाबा, एक केक आणा...मला माझे शेवटचे क्षण हसत-हसत साजरे करायचे आहेत', असे म्हणताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. पण, प्रियांकाने सर्वांना धीर दिला. आयसीयूमध्ये पती लक्ष्यराज आणि कुटुंबीयांसोबत तिने शेवटचा केक कापला. हसत हसत तिने सर्वांना केक खाऊ घातला आणि म्हणाली की, मला रडत नाही, तर हसत-हसत या जगाचा निरोप घ्यायचा आहे. 

प्रियंकाचे वडील नरपत सिंग सांगतात, जेव्हा जेव्हा मला पिहूची आठवण येते, तेव्हा तिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. चार भावंडांमध्ये तिसरी असलेली प्रियांका कुटुंबातील सर्वात लाडकी होती. अभ्यासात हुशार असलेल्या प्रियंकाने बीबीए आणि सीएची परीक्षा वास केली होती. जानेवारी २०२३ मध्ये तिचे लग्न भटवास गावातील रहिवासी लक्ष्यराज सिंगशी झाले. लग्नानंतर काही काळाने प्रियांकाचा पाय दुखू लागला. सुरुवातीला सामान्य बाब समजून दुर्लक्ष केले, परंतु हळूहळू वेदना हाडांपर्यंत पोहोचल्या. 

फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईत एमआरआय करण्यात आला, तेव्हा तिला इविंग सारकोमा नावाचा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असल्याचे आढळून आले. पहिली शस्त्रक्रिया मार्च २०२३ मध्ये झाली. दुसरी जून २०२४ मध्ये आणि तिसरी ऑगस्ट २०२४ मध्ये उदयपूरमध्ये झाली. सर्व प्रयत्न करूनही, आजार वाढतच राहिला. डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितले की, आता तिच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही.

प्रियांकाला माहित होते की, तिच्याकडे आता फार वेळ शिल्लक नाही. २५ ऑगस्ट रोजी जेव्हा सर्व नातेवाईक रुग्णालयात आले, तेव्हा तिने अचानक केक आणण्यास सांगितले. ती म्हणाली की, तिला शेवटचे क्षण संस्मरणीय बनवायचे आहेत. आयसीयूमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रियांकाने तिच्या हातांनी सर्वांना केक खाऊ घातला. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी दुपारी तिची ढासळली अन् तिने जगाचा निरोप घेतला. प्रियंकाने सर्वांना रडवले, पण स्वतः मात्र हसत हसत निघून गेली. प्रियंकाने जाता जाता या जगाला कठीण काळातही आनंदाने जगण्याचे शिकवले...

टॅग्स :cancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर