दाबोळी विमानतळ रात्री उड्डाणासाठी बंद
By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST
वास्को : दाबोळी विमानतळावर तिसर्या टप्प्यातील धावपी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात असल्याने भारतीय नौदलाने येत्या १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत विमान सेवेसाठी विमानतळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
दाबोळी विमानतळ रात्री उड्डाणासाठी बंद
वास्को : दाबोळी विमानतळावर तिसर्या टप्प्यातील धावपी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात असल्याने भारतीय नौदलाने येत्या १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत विमान सेवेसाठी विमानतळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे.यापूर्वीही दोन टप्प्यात या विमानतळावरील धावपीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. आता १ मार्च ते ३१ मार्च या काळात विमानतळ बंद मर्यादित वेळेत बंद ठेवण्यात येणार असल्याने सर्व विमान सेवा कंपन्यांनी आपल्या विमान उड्डाणाचे वेळापत्रक एका महिन्यासाठी बदलण्याची घाई झाली आहे. वेळापत्रक बदलण्यात येणार असल्याने प्रवाशांचीही काही प्रमाणात धांदल होण्याची शक्यता आहे. तरीही विमान सेवा कंपन्या प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी प्रवाशांना भ्रमणध्वनीद्वारा संदेश किंवा थेट प्रवाशांकडे संपर्क साधून त्यांना बदललेल्या वेळापत्रकाची आगाऊ माहिती देण्यास प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)