कोलकाता - बंगालच्या उपसागरामध्ये बुलबुल चक्रिवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांमध्ये रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा फटका ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता असून, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची पथके तैनात करण्यात येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलबुल चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी ओदिशा, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी काय तयारी केली आहे याचा आढावा घेण्यात आला.
पुढच्या काही तासांत बुलबुल चक्रीवादळ धारण करणार रौद्र रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 22:40 IST