‘मिचाॅंग’ धडकणार, मुसळधार बरसणार; हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:12 AM2023-12-03T10:12:57+5:302023-12-03T10:13:06+5:30

सुमारे १८ कि.मी. प्रतितास वेगाने कमी दाबाचा पट्टा अधिक दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाला

Cyclone Michong: Fishermen are prohibited from going into the sea amid warning of heavy rain | ‘मिचाॅंग’ धडकणार, मुसळधार बरसणार; हवामान खात्याचा इशारा

‘मिचाॅंग’ धडकणार, मुसळधार बरसणार; हवामान खात्याचा इशारा

भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यास ‘मिचाॅंग’ असे नाव दिले आहे. सोमवार व मंगळवारी ओडिशा, तामिळनाडू, आंध्रमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

­­सुमारे १८ कि.मी. प्रतितास वेगाने कमी दाबाचा पट्टा अधिक दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाला. सोमवारपर्यंत तो वादळात रूपांतरित होत तो उत्तर-पश्चिमेकडे मार्गाक्रमण करील. दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवरून पश्चिम-मध्य बंगाल उपसागराकडे मार्गाक्रमण करील. 

तामिळनाडूत ऑरेंज अलर्ट
तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  ४ डिसेंबरपर्यंत चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवल्लूरमध्ये  जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशात दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही पाऊस
पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Cyclone Michong: Fishermen are prohibited from going into the sea amid warning of heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.