शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Cyclone Amphan : प. बंगाल, ओडिशाला ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:12 IST

पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हतिया बेटावर दुपारी अडीच वाजता थडकल्यानंतर ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळ अधिक विक्राळ होत घरे भुईसापट करीत आणि झाडे, विजेचे खांब उखडत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने अग्रेसर झाले.

कोलकाता / भुवनेश्वर / नवी दिल्ली : ताशी १९० किलोमीटर वेगाने घोंगावणाऱ्या ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळाचा बुधवारी पश्चिम बंगालला जबर तडाखा बसला. सुसाट वादळी वाºयासोबत आलेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यात दोन जण ठार झाले आहेत. पश्चिम बंगालसोबत ओडिशातील किनारपट्टीलगतच्या भागात जोरदार वा-यासोबत पाऊसही कोसळत आहे.पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हतिया बेटावर दुपारी अडीच वाजता थडकल्यानंतर ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळ अधिक विक्राळ होत घरे भुईसापट करीत आणि झाडे, विजेचे खांब उखडत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने अग्रेसर झाले. चक्रीवादळाची स्थिती आणि दिशेचा अंदाज लागल्याने चक्रीवादळ थडकण्याआधीच पश्चिम बंगाल आणि ओडिशातील किनारपट्टीलगतच्या ६ लाख ५८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.हावडा आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मीनाखान भागात झाडे कोसळून दोन महिला ठार झाल्या.एनडीआरएफची ४० पथके तैनातराष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, चक्रीवादळाच्या वेगाने बदलत असलेल्या स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मदत व बचाव कार्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची ४० पथके तैनात करण्यात आली आहेत. कोविड-१९ चा धोका ध्यानात घेऊनच एनडीआरएफला आत दुहेरी संकटाचा मुकाबला करायचा आहे.भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी यावेळी सांगितले की, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा व पूर्व मिदनापोर जिल्ह्यात ताशी १६० ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, वाºयाचा वेग ताशी १८५ वाढू शकतो. चक्रीवादळाचा विध्वंसक भाग किनारपट्टीवर थडकल्याने या तीन जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळाच्या केंद्राचा व्यास ३० किलोमीटर होता.ओडिशातील पुरी, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपाडा, जाजपूर, गंजम, भद्रक आणि बालासोर जिल्ह्यांतील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपले. जबर नुकसान करीत चक्रीवादळ बुधवारी रात्री उशिरापर्यंत ओडिशाला पार करीत पुढे अग्रेसर होईल.

टॅग्स :Cyclone Amphanअम्फान चक्रीवादळ