क्वालालम्पूर : मलेशियात इस्लामिक स्टेटच्या तीन दहशतवाद्यांना अटक करून हल्ल्याचा कट उधळण्यात आला. हे दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बातू गुंफेतील प्रसिद्ध हिंदू मंदिर, मनोरंजन केंद्र आणि पोलीस ठाण्याला लक्ष्य करणार होते. दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या विशेष शाखेने २७ ते २९ आॅगस्टदरम्यान त्यांच्या मुसक्या आवळल्या. पहिल्या संशयिताला (२०) सेलांगोर येथे २७ आॅगस्टला जेरबंद केले. त्याच्याकडे के-७५ ग्रेनेड व एका पिस्तूलसह बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या. त्याला ही शस्त्रे मध्यस्थाकडून मिळाली. इतर दोन संशयितांना २९ आॅगस्ट रोजी पहांग शहरात अटक केली. हल्ले केल्यानंतर सिरियाला पळून जाण्याचा त्यांचा इरादा होता, असे खालीद यांनी सांगितले. या तिघांपैकी एक ट्रकचालक व दुसरा खाटीक असून, अन्य दोन जण खाटकाचे आणि तिसरा विक्रीचे काम करतो. या तिघे इस्लामिक स्टेटचा मलेशियन दहशतवादी मोहंमद वांडी मोहंमद जेदी याच्या इशाऱ्यानुसार काम करीत होते. गेल्या जूनमध्ये क्वालालम्पूरजवळील बारमध्ये ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे जेदीचेच डोके होते. (वृत्तसंस्था)
हिंदू मंदिर उडवण्याचा कट
By admin | Updated: September 1, 2016 04:25 IST