शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्राहकांना मिळणार पाच नवीन अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:37 IST

नकली वा भेसळयुक्त वस्तू देऊन फसवूणक करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांना दंड आणि तुरुंगवासालाही सामोरे जावे लागेल.

नवी दिल्ली : संसदेने ग्राहक संरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्याने जनतेला ग्राहक म्हणून पाच नवीन अधिकार मिळणार आहेत. नकली वा भेसळयुक्त वस्तू देऊन फसवूणक करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांना दंड आणि तुरुंगवासालाही सामोरे जावे लागेल.१९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा हे ग्राहक संरक्षण विधेयक (२०१९) घेईल. जगात पहिल्यांदाच ग्राहकांच्या हितासाठी दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली. नव्या कायद्यानुसार ग्राहकांना राहत असलेल्या ठिकाणांहून किंवा काम करीत ठिकाणांहून जिल्हा ग्राहक मंच किंवा राज्य ग्राहक आयोगाकडे तक्रार करता येईल.भरपाई मागण्याचा अधिकारसदोष उत्पादनामुळे नुकसान झाल्यास ग्राहक उत्पादक कंपनी किंवा विक्रेत्याविरुद्ध तक्रार दाखल करु शकतो. सर्व सेवांसाठीही हा नियम लागू असले. उत्पादन सदोष असल्यास किंवा उत्पादकांच्या वैशिष्ट्यानुसार उत्पादनाच्या हमीबाबत खात्री पटत नसल्यास नव्या कायद्यानुसार हा प्रकार अनुचित व्यापार मानला जाईल. या व्याप्तीत ई-कॉमर्सचा समावेश आहे.ग्राहकांचे वर्ग म्हणून संरक्षणग्राहकांचे हक्क, अधिकाराचे उल्लंघन किंवा अनुचित व्यापार अथवा भ्रामक जाहिराती, वर्ग म्हणून ग्राहकांच्या हिताला बाधक यासंबंधीच्या तक्रारी लेखी आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीमार्फत जिल्हाधिकारी किंवा केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे वर्ग केल्या जातील.तक्रार का फेटाळली; हे जाणून घेण्याचा हक्कसुनावणी न घेता आयोग तक्रार फेटाळू शकत नाही. तक्रार दाखल करणे व फेटाळण्यासंबंधीचा निर्णय आयोगाने २१ दिवसांत घ्यायचा आहे. मुदती आयोगाने निर्णय न घेतल्यास तक्रार दाखल झाल्याचे ग्राह्य धरले जाईल. तडजोड शक्य असल्याचे आयोगाला वाटल्यास मध्यस्थामार्फत वाद निकाली काढण्यास संमती देऊ शकतात.अशी होईल कारवाईभ्रामक जाहिरातीबद्दल उत्पादक व सेवा प्रदात्यांना २ वर्षांचा तुरुंगवास किंवा दहा लाख रुपयांचा दंड, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला चौकशी आणि आर्थिक दंड करण्याचा अधिकार. खराब वा सदोष वस्तू दिल्यास विक्रेता आणि उत्पादक कंपन्यांना जबाबदार धरले जाईल, भेसळीसाठी दंड, भेसळयुक्त वस्तूं विकल्यास परंतु, शारीरिक अपाय न झाल्यास ६ महिले तुरुंगवास आणि १ लाख रुपये दंड, शारीरिक अपाय झाल्यास १ वर्षे तुरुंगवास आणि तीन लाखापर्यंत दंड, गंभीर इजा झाल्यास ७ वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होईल.

टॅग्स :consumerग्राहक