शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

निवारागृहातील सध्याची व्यवस्था लैंगिक शोषण रोखण्यास अपुरी -सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 07:13 IST

न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंत्रालयाच्या सहसचिवांना ८ आॅक्टोबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : मुले आणि मुलींसाठीच्या निवारागृहांतील (शेल्टर होम्स) सध्याची व्यवस्था ही त्यांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी पुरेशी नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले. मुलांच्या संरक्षणासाठीचे धोरण तयार करण्याबद्दल न्यायालयाला कळवण्यात यावे, असे न्यायालयाने महिला आणि बालविकास मंत्रालयाला सांगितले.

न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंत्रालयाच्या सहसचिवांना ८ आॅक्टोबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्यांचे पुनर्वसन आणि समुदेशनासाठी नेमके काय केले जाईल, मुलांची काळजी घेणाऱ्या संस्थांतील परिस्थिती व मुलांसाठी संरक्षण धोरण तयार करण्यास नेमके काय केले जाते हे कोर्टाला समजून घेण्यास सहसचिवांची त्यादिवशी मदत घ्यायची आहे. आम्ही मुलांच्या संरक्षणासाठी धोरण तयार करण्यास सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात काही झाले नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले....तर मुजफ्फरपूरचे प्रकरण घडले नसतेनिवारागृहांतील सध्याची व्यवस्था ही पुरेशी नाही. ती तशी असती, तर मुजफ्फरपूरमध्ये जे घडले ते घडले नसते, असे न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर आणि दीपक गुप्ता यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले. मुजफ्फरपूरमध्ये (बिहार) स्वयंसेवी संस्थेकडून चालवल्या जात असलेल्या निवारागृहातील ३४ मुलींवर बलात्कार झाल्याचा आरोप असून, ते प्रकरण सध्या या न्यायालयात आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय