शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: "...तर भारतात सर्वांना कोरोना लस देण्यास तब्बल २० वर्षे लागणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 07:12 IST

वेग वाढवण्याची नितांत गरज- देवेंद्र दर्डा; आतापर्यंत ०.५% जणांनाच मिळाला डोस

नवी दिल्ली : कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला आता ३५ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत आतापर्यंत ५८ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सध्या भारताच्या लोकसंख्येच्या केवळ ०.५ टक्केच लोकांना लस मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे गरजेचे असून त्यासाठी खासगी क्षेत्रालाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचे (एबीसी) अध्यक्ष देवेंद्र दर्डा आणि रवींद्र एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष नरेंद्र मुरकुम्बी यांनी सर्वसामान्यांना लवकरात लवकर लस मिळावी यासाठी लसीकरणात खासगी रुग्णालयांच्या सहभागाची मोहीम हाती घेतली आहे. सर्वसामान्यांच्या भल्यासाठी सुरू केलेल्या या अभियानाबद्दल देवेंद्र दर्डा आणि नरेंद्र मुरकुम्बी म्हणाले की,  “तूर्तास लसीकरण मोहिमेचा वेग खूप कमी आहे. ३५ दिवसांनंतरही केवळ ०.५ टक्के लोकसंख्येलाच लसीच्या मात्रा दिल्या गेल्या आहेत. हाच वेग कायम राहिल्यास संपूर्ण लोकसंख्येला कोरोनावरील लस देण्यासाठी किमान २० वर्षे लागतील. म्हणूनच लसीकरण मोहिमेचे विकेंद्रीकरण करून खासगी क्षेत्रालाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जावे.’’भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी कोरोनावर प्रभावी ठरल्या असून त्या प्रत्येकाला दिल्या जाणे आवश्यक आहे. युरोप-अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असताना भारतात मात्र सुदैवाने दुसरी लाट आली नाही. त्यामुळे आपल्याकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल असे असताना ५० वर्षे वयावरील ३३ कोटी लोकांना १०० दिवसांत लसी देणे गरेजेचे आहे,  असे मत उभय मान्यवरांनी व्यक्त केले. 

सध्याच्या वेगाने ७५% लसीकरण पूर्ण होण्यास लागतील १० हून अधिक वर्षेकेंद्राला आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या लसींच्या मात्रासीरम इन्स्टिट्यूटकोविशिल्ड १.१ कोटी भारत बायोटेककोव्हॅक्सिन ५५ लाख

लोकसंख्येच्या ७५ टक्के लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास लागणारा कालावधी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस