शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक रोड शो ते गुजराती थाली : जपानचे पंतप्रधान शिंजो अबेच्या भारत दौ-याबद्दल जाणून घ्या 'या' 10 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:39 IST

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. त्यांच्या या भेटीत गुजरातमध्ये गुंतवणूकीचे 15 करार होणार आहेत. 

ठळक मुद्देरोड शो च्या संपूर्ण मार्गामध्ये साबरमती रिव्हरफ्रंटचाही समावेश असून, एकूण 28 छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. 1917 ते 1930 या काळात महात्मा गांधींनी साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते. 

अहमदाबाद, दि. 13 - जपानचे पंतप्रधान शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. त्यांच्या या भेटीत गुजरातमध्ये गुंतवणूकीचे 15 करार होणार आहेत. 

- भारत दौ-यावर येणारे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये रोड शो होणार आहे. विमानतळ ते टॅक्स ऑफीस या आठ किलोमीटरच्या मार्गावरील रोड शो मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. 

-  आठ किलोमीटरच्या रोड शो च्या संपूर्ण मार्गामध्ये साबरमती रिव्हरफ्रंटचाही समावेश असून, एकूण 28 छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. जिथे 28 राज्यातील कलाकार आपल्या पारंपारिक वेशभूषेत नृत्यकला सादर करतील. 

- अबे साबरमती गांधी आश्रमात जातील तेव्हा मोदी स्वत: त्यांच्यासोबत असतील. 1917 ते 1930 या काळात महात्मा गांधींनी साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते. 

- मोदी आणि शिंजो अबे 16 व्या शतकातील सिदी सय्यद मशिदीला भेट देतील. विशिष्ट प्रकारच्या दगडी बांधकामामुळे ही मशिद लक्ष वेधून घेते. यावेळी दोन्ही नेत्यांसमोर शहरातील पुरातन वास्तूंचे प्रेझेंटेशन केले जाईल. 

-  त्यानंतर मोदी आणि अबे लाल दरवाजाजवळच्या अग्गासी रेस्टॉरंटमध्ये भोजन घेतील. इथे मिळणारी गुजराती थाली या रेस्टॉरंटची ओळख आहे. 

- उद्या गुरुवारी दोन्ही नेते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी करतील. अहमदाबाद-मुंबई मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. 

- दहा डब्ब्यांच्या या बुलेट ट्रेनमध्ये 750 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल. या ट्रेनमुळे दोन शहरांमधला सात तासांचा प्रवास तीन तासावर येणार आहे. 

- पुढे या ट्रेनला 16 डब्बे असतील. त्यामधून एकाचवेळी 1200 जणांना प्रवास करता येईल. 

- बुलेट ट्रेनच्या या एकूण प्रकल्पासाठी 1.10 लाख कोटींचा खर्च येणार आहे. त्यातील 88 हजार कोटी रुपये जपान कर्ज म्हणून देणार आहे. 

- 2022 पर्यत हा प्रकल्प पूर्ण करायचा उद्देश आहे. त्याचवर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी