शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

दाट धुके, क्रूझर कालव्यात कोसळली; १० प्रवासी बेपत्ता, चालकाने अपघातापूर्वी उडी मारली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:49 IST

रात्री हा अपघात झाला असून रात्रीच बचाव कार्य सुरु करण्यात आले. यावेळी एका १० वर्षांच्या मुलाला वाचविण्यात आले आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. 

हरियाणाच्या फतेहाबादमध्ये मोठा अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे एक क्रूझर कालव्यात कोसळली आहे. या अपघातात १० प्रवासी बेपत्ता झाले आहेत. रात्री हा अपघात झाला असून रात्रीच बचाव कार्य सुरु करण्यात आले. यावेळी एका १० वर्षांच्या मुलाला वाचविण्यात आले आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. 

हे सर्वजण पंजाबमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून परतत होते. यावेळी हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हरियाणाच्या महमडा गावातील काही लोक पंजाबला एका कार्यक्रमाला गेले होते. रात्री १० च्या सुमारास ते परतत होता. रतिया गावाजवळ आले असताना भाखडा कालव्याच्या पुलावरून ही क्रूझर खाली कोसळली. धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नाही. 

नदीत गाडी कोसळण्यापूर्वी चालक जरनेल सिंगने क्रूझरबाहेर उडी मारली. यामुळे त्याचा जीव वाचला. परंतू, घटनास्थळी ड्रायव्हर सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या वाहनात १२ लोक होते. त्यात १० वर्षांचा मुलगाही होता. त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर ५५ वर्षांच्या बलबीर सिंग यांचा मृतदेह देखील सापडला आहे. 

चालकाने उडी मारल्याने तो वाचला परंतू तिथे न सापडल्याने गावातही खळबळ उडाली आहे. रतिया पोलीसही अपघात की घातपात याच्या तपासाला लागले आहेत. हे सर्वजण एका लग्न समारंभाला गेले होते. 13-14 लोक होते असे सांगितले जात आहे. मुलाला आम्ही बाहेर काढले आहे, असे  हेड कॉन्स्टेबल गुरमीत सिंग यांनी सांगितले. वाटेत खूप धुके होते. यामुळे काही दिसत नव्हते आणि कार कालव्यात पडली, असे ते म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघात