शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खनिज तेलाचे पैसे रुपयात देण्याची भारतास सवलत द्या: मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 5:04 AM

इंधनचटके : मोदींचे जागतिक तेल उत्पादकांना आवाहन

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाच्या चढ्या किमतींमुळे आर्थिक अडचणी सोसाव्या लागणाऱ्या भारतासारख्या देशास तेलाचे पैसे रुपयात चुकते करण्याची सवलत द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक तेल उत्पादकांना केले.

जगातील आघाडीच्या तेल उत्पादक कंपन्यांचे प्रमुख व सौदी अरबस्तान व संयुक्त अरब अमिरात यासारख्या मुख्य तेल उत्पादक देशांच्या तेलमंत्र्यांच्या गोलमेज परिषदेत पंतप्रधान बोलत होते. मोदी म्हणाले की, एकीकडे खनिज तेलाच्या किमती वाढत असतानाच दुसरीकडे भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मूल्य घसरत असल्याने खास करून भारताला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून तेलाची किंमत रुपयांत चुकती करण्याची सवलत उत्पादकांनी दिली तर भारताला मोठा दिलासा मिळू शकेल. तेल उत्पादकांनी खरेदीदारांना केवळ ग्राहक म्हणून न पाहता एकूणच बाजारपेठेच्या विकासासाठी त्यांच्याकडे भागीदार म्हणून पाहावे, असे मतही मोदी यांनी मांडले.

हे सरकार सत्तेवर आल्यापासून अशा प्रकारची ही तिसरी गोलमेज परिषद होती. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताची अडचण विशद करताना सांगितले की, गेल्या वर्षभरात जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती डॉलरच्या रूपात ५० टक्क्यांनी व रुपयाच्या रूपात ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणून भारताला मोठी रोखतेची टंचाई जाणवत आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हेही या परिषदेस हजर होते.

इराणी तेलाला सौदी अरेबियाचा पर्यायआयओसीसारख्या भारतीय तेल कंपन्यांनी सौदी अरेबिया व इराकसारख्या देशांशी अतिरिक्त तेलपुरवठ्याचे करार केले आहेत. त्यामुळे इराणवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा परिणाम भारतावर होणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.२०१८-१९ या वर्षात इराणकडून २५ दशलक्ष टन तेल खरेदीचा करार भारताने केला आहे. २०१७-१८ मध्ये हा करार २२.६ दशलक्ष टनांचा होता. अमेरिकी निर्बंधांमुळे इराणकडून भारताला तेल खरेदी शक्य झाली नाही, तरी घाबरण्याचे कारण नाही. मुदत पुरवठादारांशी भारताने अतिरिक्त तेलाचे करार आधीच करून ठेवले आहेत. गरज पडेल तेव्हा ते उचलता येईल.काही नफा तेलसाठे शोधासाठी वळवा

गेल्या दोन परिषदांमध्ये उत्पादकांनी केलेल्या सूचना मान्य करून भारताने बर्याच सुधारणा केल्या आहेत. तरी उत्पादक कंपन्यांनी भारतात फारशी गुंतवणूक केलेली नाही, असे नमूद करून पंतप्रधांनी असेही आवाहन केले की, उत्पादकांनी त्यांच्या नफ्यापैकी काही हिस्सा भारतात तेलसाठ्यांचा शोध आणि विकास करण्यासाठी गुंतवणूक म्हणून वळवावा.

टॅग्स :Petrolपेट्रोलFuel Hikeइंधन दरवाढ