शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कच्चा तेलाचा भाव 14 डॉलरने घसरला, पण भारतात पेट्रोल-डिझेल जैसे थे; जाणून घ्या आजचे दर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 09:22 IST

गेल्या महिन्यात प्रति बॅरल 85 डॉलरच्या पातळीवर पोहोचलेल्या कच्चा तेलाचे दर 70 डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहेत.

नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात(Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली, परंतु तेव्हापासून देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. 

कच्चा तेलाचे दर घसरलेकच्च्या तेलाच्या किमती विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत लक्षणीय घसरल्या आहेत. गेल्या महिन्यात प्रति बॅरल $85 च्या पातळीवर पोहोचलेले ब्रेंट क्रूड ऑईल गेल्या काही आठवड्यात घसरले आहे. सध्या कच्चा तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारात $70-72 रुपये प्रति बॅरल दर आहेत. 3 नोव्हेंबर रोजी ब्रेंट क्रूड $ 84वर विकले जात होते, तर 3 डिसेंबर रोजी त्याचे भाव $70 च्या पातळीवर आले होते. म्हणजेत कच्चा तेलाचे दर 14 डॉलरने घसरले आहेत. पण, अद्याप भारतीयांना पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळालेला नाही.

देशातील दर जैसे थेकाल आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $70 च्या पातळीवर आला होता, तर आठवड्यापूर्वी तो $79 प्रति बॅरल होता. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडची वायदे किंमत 2.99 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 70.45 वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरुवारपासून दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पण, अजूनही देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे भाव 100च्या पुढेच आहेत. 

हे आहेत विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर: 

  • मुंबई: पेट्रोल - ₹109.98 प्रति लिटर; डिझेल - ₹ 94.14 प्रति लिटर
  • दिल्ली: पेट्रोल - ₹95.41 प्रति लिटर; डिझेल - ₹86.67 प्रति लिटर
  • कोलकाता: पेट्रोल - ₹104.67 प्रति लिटर; डिझेल - ₹ 89.79 प्रति लिटर
  • चेन्नई: पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर; डिझेल - ₹91.43 प्रति लिटर
  • नोएडा: पेट्रोल - ₹95.51 प्रति लिटर; डिझेल - ₹ 87.01 प्रति लिटर
  • भोपाळ: पेट्रोल - ₹107.23 प्रति लिटर; डिझेल - ₹90.87 प्रति लिटर
  • बंगळुरू: पेट्रोल - ₹100.58 प्रति लिटर; डिझेल - ₹ 85.01 प्रति लिटर
  • लखनऊ: पेट्रोल - 95.28 रुपये प्रति लिटर, डिझेल - 86.80 रुपये प्रति लिटर
  • चंदीगड: पेट्रोल - ₹94.23 प्रति लिटर; डिझेल - 80.90 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा

परकीय चलन बाजार आणि कच्च्या तेलाच्या किमतींनुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती देशात दररोज बदलतात. चांगली गोष्ट म्हणजे तेलाची किंमत तुम्हाला घरबसल्या कळू शकते. यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल मेसेज सर्व्हिस अंतर्गत 9224992249 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. यासाठी तुम्हाला मेसेजमध्ये लिहावे लागेल - RSPपेट्रोल पंप डीलरचा कोड. तसेच, तुम्ही इंडियन ऑइलच्या वेबसाइटला भेट देऊन तुमच्या क्षेत्राचा RSP कोड तपासू शकता. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या फोनमध्ये इंधनाच्या नवीन किंमतीचा अलर्ट येईल.

टॅग्स :Crude Oilखनिज तेलPetrolपेट्रोलDieselडिझेल