Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मध्य काश्मीरमधील बडगामच्या खानसाहिब तहसीलमधील तंगनार भागात सीआरपीएफच्या वाहनाला भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वाहन रस्त्यावरुन घसरले अन् खोल खड्ड्यात पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले अन् गाडी खोल खड्ड्यात पडली. या घटनेत विशेष क्यूएटी दक्षिण श्रीनगर रेंजचे सुमारे दहा सैनिक जखमी झाले असून, त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सर्व जखमींना श्रीनगर येथील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात अनेक सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच बचाव कार्य सुरू करण्यात आले.