शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जवानाचे अतुलनीय शौर्य, 20 जवानांचे प्राण वाचवून झाला शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 01:16 IST

भारतीय लष्करातील जवान देशवासीयांच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सज्ज असतात. जवानांच्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय आणून देणारी घटना घडली आहे.

इन्फाळ- भारतीय लष्करातील जवान देशवासीयांच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सज्ज असतात. जवानांच्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय आणून देणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. इन्फाळमध्ये कर्तव्यावर असलेल्या सीआरपीएफच्या एका जवानाने प्रसंगावधान राखत बसमधून प्रवास करणा-या इतर 20 जवानांचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमधून सीआरपीएफ जवानांची एक तुकडी कंगपोकपी जिल्ह्यातून इन्फाळमधल्या पश्चिम जिल्ह्यातील लामफेलमधील शिबिराकडे जात होती. त्याच दरम्यान बसमध्ये ग्रेनेड फेकण्यात आला. बसमध्ये पडलेला (ग्रेनेड) बॉम्ब त्या जवानानं पाहिला अन् प्रसंगावधान राखत ग्रेनेड घेऊन त्या जवानानं बसबाहेर धाव घेतली. त्याचदरम्यान या ग्रेनेडचा स्फोट झाला. या जवानाला वीरमरण आले, मात्र बसमधून प्रवास करणाऱ्या 20 जवानांचे प्राण वाचले.उमेश हेलवार असे या वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून, ते बेळगावजवळील गोकाक येथील रहिवासी आहेत. ते मणिपूरमधील इंफाळ येथे कर्तव्यावर होते. तिथे एका बसमधून प्रवास करत असताना हेलावार यांना बसमध्ये पडलेले ग्रेनेड दिसले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता हे ग्रेनेड घेऊन ते बसबाहेर धावले. तेवढ्यातच या ग्रेनेडचा स्फोट होऊन हेलवार यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या 20 जवानांचे प्राण वाचले. शहीद उमेश हेलवार यांचे पार्थिव शरीर त्यांचा मूळ गावी आणण्यात आले. उमेश यांच्या पश्चात वडील, आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान,  उमेश यांच्यावर संपूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSoldierसैनिक