शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रजेवर जाणाऱ्या जवानांना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सुविधा; सीआरपीएफकडून आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 13:22 IST

crpf jawans going on leave get mi 17 helicopter ferry facility: घातपाताचा धोका ओळखून गृह मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जवानांना एम-१७ हेलिकॉप्टर सेवेचा वापर करता येणार

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी खास सुविधा देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेले जवान सुट्टीवर जात असताना त्यांना एमआय-१७ विमानांचा वापर करता येईल. (crpf jawans going on leave get mi 17 helicopter ferry facility )काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी आयईडीचा वापर करतात. त्यामुळे जवानांना धोका असतो. हा धोका लक्षात घेऊन मोदी सरकारनं सीआरपीएफच्या जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या जवानांना सुट्टीवर जायचं असल्यास त्यांना जवळच्या बेसवर एमआय-१७ हेलिकॉप्टरनं सोडण्यात येईल. गृह मंत्रालयानं गुरुवारी हा निर्णय घेतला आहे. मॅग्नेटिक आयईडी आणि आरसीआयईडी हल्ल्याचा धोका असल्यानं रजेवर जात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना एमआय-१७ हेलिकॉप्टरनं जवळच्या बेसवर सोडण्यात येईल. आठवड्यातील तीन दिवस यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी सीआरपीएफनं जवानांसाठी पत्र जारी केलं आहे. हेलिकॉप्टरची सुविधा मिळवण्यासाठीची माहिती आणि इतर आवश्यक तपशील यामध्ये देण्यात आला असल्याचं गृह मंत्रालयानं आदेशात म्हटलं आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला