शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:13 IST

या योजनेचा सर्वात जास्त फायदा रोज ऑफिस आणि बिझनेस ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांना होणार आहे.

जर तुम्ही दर दिवशी हायवेवरून प्रवास करत असाल आणि वारंवार तुम्हाला टोल भरण्यास अडचण येत असेल तर सरकारने तुमच्यासाठी एक फायदेशीर योजना घोषित केली आहे. केंद्र सरकारने FASTag आधारित वार्षिक पास योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरात ही योजना लागू होईल. या योजनेतून लाखो वाहन चालक आणि प्रवाशांना दिलासा मिळेल. 

काय आहे वार्षिक पास योजना?

हा पास विशेषत: खासगी वाहन चालवणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. ज्यात कार, जीप, व्हॅनसारख्या वाहनांचा समावेश असेल. या पासची किंमत ३ हजार असेल. या पास अंतर्गत वाहन चालक एक वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त २०० वेळा टोलमधून प्रवास करू शकतात. त्याचा अर्थ वारंवार टोल भरण्यापासून सुटका होईल. 

या योजनेची मुख्य वैशिष्टे?

  • एकदा ३ हजार भरल्यानंतर पूर्ण वर्ष टोलसाठी वारंवार पेमेंट करण्याची गरज नाही. 
  • हा पास राष्ट्रीय हायवेवरील सर्व टोल नाक्यासाठी लागू असेल
  • वेळ आणि इंधन बचत - टोल नाक्यावर अधिक वेळ थांबून इंधन वाया जाणे थांबेल. लांब रांगा आणि कॅश पेमेंटची अडचण कमी होईल. 
  • स्थानिक प्रवासात लाभदायक - ६० किमी अंतरात येणाऱ्या जाणाऱ्यांना वारंवार टोल देण्याची गरज नाही. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या खासगी वाहन धारकांना त्याचा फायदा होईल. 
  • एका दिवसात कितीही करा प्रवास - बऱ्याचदा टोल नाक्यावर २४ तासांत रिटर्न येणाऱ्यांना टोलमधून काही सूट दिली जाते. मात्र या पासामुळे दिवसभरातून कितीही वेळा टोलमधून प्रवास करता येईल. परंतु वर्षाला २०० हून अधिक वेळा टोल क्रॉस करता येणार नाही हे लक्षात ठेवा. 

 

कुणाला होणार अधिक फायदा?

या योजनेचा सर्वात जास्त फायदा रोज ऑफिस आणि बिझनेस ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांना होणार आहे. जे लोक नेहमी लॉग्न ड्राईव्ह अथवा रोड ट्रिप्सवर जातात. त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही योजना केवळ पैसे वाचवणार नाही तर वेळ, इंधनही वाचवणार आहे. त्याशिवाय टोल नाक्यावर होणारे वाद, चुकीची टोल कपात आणि रिफंडसारख्या समस्याही खूप प्रमाणात कमी होतील.

पास घेण्याची प्रक्रिया कशी असेल?

वार्षिक पास घेणे खूप सोपे आहे. सरकारची ही नवी योजना असल्याने NHAI आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँन्ड हायवे यांच्या वेबसाईटवर आणि हायवे ट्रॅव्हल APP वर नवीन पोर्टल सुरू केले जाईल. तिथून लोक ऑनलाईन अर्ज करू शकतील. तिथून तुमच्याकडे असलेल्या FASTag अकाऊंटशी लिंक करता येईल.  

टॅग्स :tollplazaटोलनाका