शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! अचानक बँक खात्यात आले कोट्यवधी रुपये पण...; न्यायासाठी 'तो' मागतोय दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 13:39 IST

मोहम्मद अस्लम रातोरात करोडपती बनून सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. मात्र अस्लमच्या अडचणी आता वाढल्या आहेत.

उत्तर प्रदेशच्या उपरकोट नगर कोतवाली परिसरातील भुजपुरा येथील रहिवासी असलेला मोहम्मद अस्लम रातोरात करोडपती बनून सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. मात्र अस्लमच्या अडचणी आता वाढल्या आहेत. तो न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागत आहे. सध्या सायबर गुन्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

दिवाळीत अस्लमच्या दोन बँका IDFC आणि UCO खात्यात जवळपास 4.78 कोटी रुपये आले होते. यानंतर त्याने आपल्या दोन्ही बँक मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली आणि पोलिसांतही तक्रार केली. मॅनेजरने अस्लमचं अकाऊंट फ्रिज करण्याची सूचना दिली. परंतू मोहम्मद अस्लम याने आता आरोप केला आहे की त्याचे खाते 13 नोव्हेंबर रोजी फ्रिज आले होते, तरीही त्याच्या खात्यात पैसे येण्याची प्रक्रिया थांबत नाही. 

14 नोव्हेंबर रोजी अस्लमच्या खात्यातून सुमारे 7 कोटी रुपये बँकेने काढले. आता नाराज झालेल्या अस्लमने एसएसपी कार्यालय गाठून तक्रार केली आहे.  बँकेने त्याला आता नोटीस दिली आहे की त्याचं खातं मायनसमध्ये असून त्याला आता पैसे द्यावे लागणार आहेत. 

या अनोख्या प्रकरणात अस्लमने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा, असं आवाहन केलं आहे. अस्लमने यापूर्वीच बँक आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती, आता सायबर क्राईम तपास करत आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :bankबँकMONEYपैसा