शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा कंपनीची नकारघंटा; शेतकरी हैराण, मुरुडमध्ये पंचनामे करण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 23:44 IST

Farmer News : मुरूड  तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात भात शेतीचे पीक घेतले जाते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मुरूड तालुक्यांतील सहभागी शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

मुरूड  - तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात भात शेतीचे पीक घेतले जाते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मुरूड तालुक्यांतील सहभागी शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची आशा होती; मात्र पीक विमा कंपनीची विमा क्लेम देण्याची नकारघंटा असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याच्या आवाहनाला १४७ शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरमार्फत जुलै २०१९ मध्ये खरीप पीक २०२० साठी पीक विमा काढला. तथापि, पीक विमा कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच भात शेती नुकसानाचे पंचनामे करण्याची कुठलीही तसदी घेतली नाही. केवळ क्रॉप इन्शुरन्स ॲप लोड करण्यास सांगुन वेळ मारून नेली. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या आहेच. शिवाय किती शेतकरी संगणक साक्षर आहेत, हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी नुकसानाचे सूचना फॉर्म म्हणजे क्लेम अप्लिकेशन केले असेल त्यांनाच विमा कंपनी पीक विमा नुकसान भरपाई देणार असल्याचे समजते. विमा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कृषी विभागाकडून केलेले भात शेती नुकसानाचे पंचनामे गृहित धरले जातील, असे मोघम उत्तर देत वेळ मारून नेली.  लवकरच जनआंदोलनपीक विमा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीत संघटनेकडे तक्रारी आल्या असून, आम्ही या जिव्हाळ्याच्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच मोठे जनआंदोलन उभारणार आहोत असे किसान क्रांती संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती