शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींवर टीका; मालदीवच्या ३ मंत्र्यांना डच्चू, सोशल मीडियावर ‘बायकॉट मालदीव’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 05:45 IST

सेलिब्रिटींचा ‘चलो लक्षद्वीप’नारा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदींविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’हा ट्रेंड सुरू केला असून त्यात सेलिब्रिटींनीही उडी घेतली. त्यानंतर मालदीव सरकारने सारवासारव करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मरियम शिउना,  जाहीद रमीझ आणि महजूम माजिद यांना निलंबित केले.

पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर भारतीय पर्यटकांमध्ये लक्षद्वीपच्या पर्यटनाबाबत कौतुक केले जाऊ लागले. मालदीवला जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे चांगले आहे, असे अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले. यामुळे संतप्त झालेल्या मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवच्या (पीपीएम) मंत्री मरियम शिउना आणि नेते जाहिद रमीझ यांनी भारतीयांची खिल्ली उडवली. शिउना यांनी एक्सवर पंतप्रधान मोदींसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्याचवेळी जाहिद रमीझ यांनी भारत आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे म्हटले.

अनेक नेत्यांकडून टीका

सदर प्रकाराबाबत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी या प्रकाराबाबत भारताशी चर्चा करून आपली बाजू मांडावी. सरकार या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले.

मालदीवमध्ये आदरातिथ्य, शांतता, सहिष्णुतेच्या मुद्यावर पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. भारतासह जगभरातील कंपन्यांनी येथे मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे आज झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा असल्याचे माजी राष्ट्रपती अहमद अदीब यांनी म्हटले.

भारतीय पर्यटनाला पाठिंबा देऊ या...

  • बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने ट्वीट केले की, मालदीवमधील प्रमुख सार्वजनिक व्यक्तींकडून भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या आल्या.
  • मालदीवमध्ये भारतातून सर्वाधिक पर्यटक येत असताना, त्यांनी मत व्यक्त करणे हे आश्चर्यकारक आहे. 
  • मी मालदीवला अनेकदा भेट दिली आहे आणि नेहमी त्याची प्रशंसा केली आहे, पण आता आपण #ExploreIndianIslands म्हणत स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देऊया. 
  • सचिन तेंडुलकरने सिंधुदुर्गला पर्यटनाला जाण्याचे आवाहन केले, तर जॉन अब्राहमनेही लक्षद्वीपचा आग्रह धरला.

भारतीयांनी फिरवली मालदीव पर्यटनाकडे पाठ

नेते जाहिद रमीझच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर भारतीय आणि मालदीवच्या नागरिकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. भारतीय लोकांचा संताप इतका वाढला की #BoycottMaldives ही मोहीम सुरू झाली. अनेक भारतीयांनी मालदीवच्या सुट्या रद्द केल्या आहेत.

हॉटेल, विमानांचे बुकिंगही झाले रद्द

मालदीवच्या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत मालदीवमधील ८,००० हून अधिक हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. दुसरीकडे, २५०० हून अधिक लोकांनी मालदीवसाठी जाणाऱ्या विमानांची तिकिटे रद्द केली आहेत. त्याचा फटका मालदीवला बसत आहे.

मालदीव सरकारकडून नरमाईची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानावर भारतीय उच्चायुक्तांनी तेथील सरकार समक्ष हा मुद्द मांडला. त्यानंतर मालदीव सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. सदर वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. सरकार त्यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले.

टॅग्स :lakshadweep-pcलक्षद्वीपMaldivesमालदीवprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीbollywoodबॉलिवूड