शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

देशातील ४० टक्के खासदारांवर फौजदारी खटले; ADR च्या अहवालात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 07:56 IST

देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची सरासरी संपत्ती ३८.३३ कोटी रुपये आहे. 

नवी दिल्ली : देशातील जवळपास ४० टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असून, त्यापैकी २५ टक्के खासदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्याखाली गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात 'द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने माहिती दिली आहे. तसेच, देशातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची सरासरी संपत्ती ३८.३३ कोटी रुपये आहे. 

लोकसभा व राज्यसभेतील एकूण ७७६ खासदारांपैकी ७६३ खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांतील माहितीच्या आधारे 'एडीआर' व 'नॅशनल इलेक्शन वॉच' या संस्थांनी ही आकडेवारी दिली आहे. खासदारांनी आपली शेवटची निवडणूक आणि त्यानंतरची कोणतीही पोटनिवडणूक लढवण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही आकडेवारी काढण्यात आली आहे. लोकसभेच्या चार आणि राज्यसभेच्या एक जागा रिक्त असून जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा अपरिभाषित आहेत. तसेच, एक लोकसभा खासदार आणि तीन राज्यसभा खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले नाही, कारण ही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. 

एडीआरच्या माहितीनुसार, ७६३ विद्यमान खासदारांपैकी ३०६ (४० टक्के) विद्यमान खासदारांवर फौजदारी गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर १९४ (२५ टक्के) विद्यमान खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्हे इत्यादींचा समावेश आहे. केरळमधील लोकसभा व राज्यसभेच्या २९ खासदारांपैकी २३ खासदारांवर गुन्हे दाखल आहे. बिहारमधील ५६पैकी ४१, महाराष्ट्रातील ६५पैकी ३७, तेलंगणातील २४ पैकी १३, उत्तर प्रदेशातील १०८ पैकी ३७ आणि दिल्लीतील १० पैकी पाच खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात दोन्ही सभागृहांतील खासदारांचा समावेश आहे.

भाजपच्या १३९ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद! भाजपच्या एकूण ३८५ खासदारांपैकी १३९ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे, तर काँग्रेसच्या ८१ खासदारांपैकी ४३ खासदारांविरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत. इतर पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस ३६पैकी १४, राष्ट्रीय जनता दल सहापैकी पाच, 'माकप' आठपैकी सहा, आम आदमी पक्ष ११पैकी तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठपैकी तीन याप्रकारे गुन्ह्यांची नोंद आहे.

टॅग्स :Member of parliamentखासदारParliamentसंसद