शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

Crime: आमदाराच्या पुतण्याची गुंडगिरी, महिलेला केली शिविगाळ, मग मारले चाबकाचे फटके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 11:17 IST

Bihar Crime News: बिहारमध्ये पुन्हा एकदा बळ आणि सत्तेचा माज दाखवून देणारी घटना घडली आहे. ही घटना खगडिया जिल्ह्यातील असून, येथे जेडीयू आमदाराच्या पुतण्याने सत्तेचा माज दाखवत एका महिलेला शिविगाळ करत चाबकाने मारहाण केली.

बिहारमध्ये पुन्हा एकदा बळ आणि सत्तेचा माज दाखवून देणारी घटना घडली आहे. ही घटना खगडिया जिल्ह्यातील असून, येथे जेडीयू आमदाराच्या पुतण्याने सत्तेचा माज दाखवत एका महिलेला शिविगाळ करत चाबकाने मारहाण केली. आमदाराच्या पुतण्याने केलेल्या या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ बेलदोर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पनसलबा गावातील आहे. येथे एका महिलेला काही तरुण बेदम मारहाणा करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे तरुण महिलेला हंटरने वारंवार मारहाण करताना दिसत आहेत. तसेच त्या महिलेला गाव सोडून जाण्यास सांगताना दिसत आहेत. तसेच या दरम्यान त्या महिलेला शिविगाळही करताना हे तरुण दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असलेला एक तरुण हा बेलदोरचे जेडीयू आमदार पन्नालाल पटेल यांचा पुतण्या अक्षय पटेल असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला ही उत्तर प्रदेशमधील राहणारी आहे. तसेच गावातीलच एक तरुण लग्न करण्यासाठी तिला खगडिया येथे घेऊन आला होता. काही महिन्यानंतर महिलेचा पती मोलमजुरी करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. त्यानंतर ही महिला गावात एकटीच राहत होती. आता या महिलेला नेमकी मारहाण का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. या तपासानंतरच या घटनेमागचं खरं कारण समोर येणार आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खगडियाचे एसपी अमितेश कुमार यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी या व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणाची ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिलेचाही शोध घेतला जात आहे.  जर महिलेने तक्रार दिली नाही तर पोलिसांच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार