शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
3
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
4
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
5
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
6
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
7
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
8
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
9
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
10
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
11
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
12
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
13
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
14
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
15
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
16
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
17
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
18
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
19
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
20
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली एनसीआरमधील गुन्ह्यांत दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 01:09 IST

‘कॅग’चे ताशेरे : पोलिसांना करावे लागते १५ तास काम

विकास झाडे ।

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये २०१३ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्ह्यांमध्ये २७५ टक्के वाढ झाली आहे. तसेच, मनुष्यबळअभावी पोलिसांना ८ तासांऐवजी १२ ते १५ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्ह्यांचा तपास करणे यावर मोठा परिणाम झाला असल्याकडे कॅगने लक्ष वेधले आहे. कॅगने यासंदर्भात २३ सप्टेंबर २०२० रोजी संसदेत अहवाल सादर केला आहे.

मुंबई पोलिसांच्या व्यक्तीगत सुरक्षा अ‍ॅपच्या तुलनेत दिल्ली पोलिसांचे ‘हिंमत’ अ‍ॅप अत्यंत प्रभावहीन असून अ‍ॅपच्या प्रचारावरच अतोनात खर्च करण्यात आल्याचे ताशेरे भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परिक्षकांनी (कॅग) ओढले आहेत. दिल्ली पोलिसांचे अ‍ॅप व्यस्त झाल्याचे जाणवते. याशिवाय दिल्ली पोलिसांचे सहा वेब अप्लीकेशन एचटीटीपीएस प्रोटोकॉलनुसार सुरक्षित नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आॅनलाईन एफआयआर नोंदवितांना फॉर्म भरावा लागतो परंतु पोलिसांच्या आयटीसेलकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.कॅगने काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे की, दिल्लीत २० टक्के घटनांमध्ये पीसीआर व्हॅनला पोहचायला ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. इथे पीसीआर व्हॅनची संख्या ही ६१७१ हवी परंतु सध्या ४१४१ व्हॅन उपलब्ध आहेत. त्यातील ५५ टक्के व्हॅनमध्ये पोलीस बंदुकाविनाच आहे. पोलिसांकडे असलेली संचार यंत्रणा (वायरलेस आदी) ही २० वर्षांपुर्वीची आहे.२०१८ मध्ये २ लाख ५१ हजार गुन्हे2013 मध्ये एनसीआरटीमध्ये ८० हजार भादंवि गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०१८ मध्ये ही संख्या वाढून २ लाख ५१ हजारांवर गेली आहे. दिल्ली पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या किमान ३३ टक्के असावी परंतु त्यांची टक्केवारी केवळ ११.७५च्या घरात आहे.च्पोलीस संशोधन आणि विभागाच्या मानदंडानुसार दिल्लीतील तपासण्यात आलेल्या ७२ पोलीस स्टेशनपैकी केवळ एका पोलिस स्टेशनमध्ये मनुष्यबळ पूर्ण होते.2018-19या आर्थिक वर्षात शहरातील ३८७० सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करण्यात आली त्यातील ३५ टक्क्यांपेक्षा अधिक कॅमेरे बंद होते. ड्युटीवर तैनात असलेल्यांच्या तुलनेत बुलेटप्रुफ जॅकेट्स कमी असल्याचे कॅगच्य निदर्शनास आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली